Tukaram Mundhe यांनी मागवली 'ती' फाईल, पण मिळण्यापुर्वीच निघाला बदलीचा आदेश...

आरोग्य विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच त्यांनी निर्णयांचा धडाका लावला.
IAS Tukaram Mundhe
IAS Tukaram Mundhe Sarkarnama

Tukaram Mundhe Transfer Latest news update : आरोग्य विभागाच्या कुटुंबकल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची पुन्हा बदली करण्यात आली. त्यानंतर तुकाराम मुंढे कोणत्या खात्यात जाणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, अवघ्या ५९ दिवसांत मुंढे यांची बदली झाल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. मुंढे यांनी काही महत्त्वाची माहिती मागवली होती आणि ती मिळण्यापूर्वीच त्यांना हटवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दवाखान्यांचा कायापालट करण्यासाठी त्यांनी जणु शपथच घेतली होती. आरोग्य विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच त्यांनी निर्णयांचा धडाका लावला. सरकारी रुग्णालयातच गरिबांना मिळणाऱ्या सुविधा आणखी दर्जेदार करण्याचे आदेश दिले. सरकारी पण तिथेच ते निशाण्यावर आले. मुंढे यांच्याविरोधात लॉबी सक्रिय झाल्यामुळे सरकारने दबावातून ही बदली केल्याच्या चर्चा आता दबक्या आवाजात होऊ लागल्या आहेत. पण तुकाराम मुंढेंनी नेमकी कोणती माहिती मागवली होता, त्यामुळे कुणाला घाम फुटला होता आणि दोनच महिन्यात बदली का झाली, याबाबतही आता चर्चा रंगू लागली आहे.

IAS Tukaram Mundhe
Marathwada News : मराठवाड्यातील 25 गावांनाही तेलंगणात सामील व्हायचयं..!

आरोग्य सेवा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच मुंढे यांनी सर्वात आधी सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची उपस्थितीत वाढ केली. मोफत सुविधा देणाऱ्या ओपीडीचे तास वाढवले, रात्रीच्या वेळीही वरिष्ठ डॉक्टरांचेही राऊंड सुरू केले, सरकारी रुग्णालयातील स्वच्छता आणि औषधांची उपलब्धता वाढवण्यासाठीही निर्देश दिले. या कामामुळे फक्त दोनच महिन्यात रुग्णांमध्ये मुंढेची लोकप्रियता वाढु लागली. असे सुरु असतानाच दुसरीकडे आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचे खटके उडायला लागल्याच्या चर्चा होत्या.

तुकाराम मुंढेंच्या बदलीची कारणं?

पण तुकाराम मुंढे आपल्या कामाची पुढची धोरणं आखत असतानाच पुन्हा त्यांच्या बदलीचा आदेशही आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम मुंढे यांनी कोरोना काळातील गैरव्यवहाराची माहिती मागवली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी सरकारी डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिसवर मर्यादा आणत त्यांना जास्तीत जास्त सरकारी रुग्णालयांमध्ये सेवा देण्यास सक्ती केली. तसेच सरकारी रुग्णालयातल्या पेशंटला खाजगी रुग्णालयात (रेफरल) जाण्याचा सल्ला देण्यावर बंदी घातली. खाजगी दवाखान्यातल्या औषधांऐवजी सरकारी रुग्णालयातलीच औषधं देण्याचे आदेश दिले. यासोबतच कोणत्या सरकारी डॉक्टरांचे नातेवाईक खाजगी दवाखाने चालवतात याचीही त्यांनी माहिती मागवल्याची माहिती समोर आली आहे. याच निर्णयांमुळे तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तुकाराम मुंढेंच्या या कामांमुळेच आरोग्य क्षेत्रातील लॉबी त्यांच्याविरोघात सक्रिय झाली. मुंढे यांच्या निर्णयामुळे खाजगी दवाखान्यांना मोठा फटका बसू लागला होता, तर दुसरीकडे मुंढे यांच्या बदलीत आपला कोणताही सहभाग नसल्याचं सागंत आरोग्यमंत्र्यांनी तानाजी सावंत यांनी त्यांच्या बाजूने हा विषय संपवला. पण खाजगी दवाखान्यांचा खर्च परवडत नसल्यामुळे कायम सरकारी दवाखान्यातच जाणारे रुग्णांमध्ये मुंढेंच्या बदलीमुळे मोठे संभ्रमाचे वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com