Love jihad in Pune : मंचरमधील 'ते' प्रकरण लव्ह जिहादचंच; गोपीचंद पडळकरांचा आरोप

Gopichand Padalkar : माहिती देऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचाही केला आरोप
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSarkarnama

Gopichand Padalkar on Love jihad : मंचर शहरातील एका धनगर कुटुंबातील अल्पवयीन मुलीला चार वर्षांपूर्वी मुस्लीम मुलाने फूस लावून पळवून नेले.या चार वर्षात मुलीला गैरप्रकार करण्यास भाग पाडले. तिचा छळ करण्यात आला. त्यामुळे हे प्रकरण लव्ह जिहादचेच असल्याचा दावा भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

मंचर (ता. आंबेगाव, पुणे) येथे प्रसारमाध्यमांशी पडळकर (Gopichand Padalkar) बोलत होते. यावेळी संबंधित मुलगी आणि तिचे नातेवाईकही उपस्थित होते. यावेळी पडळकर यांनी या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

पडळकर म्हणाले, "दहावीची परीक्षा संपली त्याच दिवशी मंचर येथील पीडित मुलीला मुस्लीम मुलाने फूस लावून पळवून नेले. हा मुलागा पीडित मुलीच्या मैत्रिणीचा भाऊ आहे. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी सर्व माहिती देऊनही त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. तसेच या प्रकरणी अज्ञानाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर वारंवार मदत मागूनही पोलिसांनी हालचाल केली नाही. दरम्यान, आरोपीने मुलीला उत्तरप्रदेशला नेले होते."

Gopichand Padalkar
Nana Patole News : पटोलेंच्या विरोधातील तक्रारींची काँग्रेसश्रेष्ठी दखल घेणार?

या चार वर्षात पीडितेचा छळ करण्यात आल्याचेही पडळकर यांनी सांगितले. त्यांनी सांगितले, " आरोपी मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांनी या चार वर्षांत पीडित मुलीला बुरखा घालण्यास भाग पाडले. बीफ खाऊ घातले. तिला नमाज करण्यास सांगितले. तिला गैरप्रकार करण्यास भाग पाडले. तिच्या अंगावर सिगारेटचे चटके दिले आहेत. तिला वारंवार झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या. या काळात तिला कुटुंबियांशी संपर्क करून दिला नाही. गेल्या सहा महिन्यापूर्वी आरोपी हा मंचर (Manchar) येथे आला आहे. तेथे तिला कोंडून ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी. तसेच आरोपीच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करावा."

Gopichand Padalkar
AAP News: महाराष्ट्रात पक्ष मजबूत करण्यासाठी 'आप'चा मोठा निर्णय; तयार केला 'हा' मास्टर प्लॅन

पडळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावरही निशाणा साधला. पडळकर म्हणाले, "मतांचे राजकार करण्यासाठी अनेक नेते राज्यात लव्ह जिहाद नाही, अशा चर्चांना हवा देतात. मला लव्ह जिहाद माहिती नाही, असे म्हणाऱ्यांनी या कुटुंबीयांना, पीडित मुलीशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात." ही घटना माजी गृहमंत्र्यांच्या तालुक्यात घडल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. माजी गृहमंत्र्यांनी तरी आपली भूमीका मांडावी, असे आवाहनही पडळकर यांनी दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना यावेळी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com