Kasaba By-Election : कसबा विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर? आघाडीत बिघाडीची शक्यता...

कसबा विधानसभेसाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Kasaba by-election News: भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच आता या निवडणुकीत शिवसनेनेही उडी घेतली आहे. कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. २६ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कसबा पोटनिवडणूक लढवावी, अशी शिवसैनिकांची मागणी असल्यामुळे ठाकरे गटाने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात रविवारी (२९ जानेवारी) झालेल्या बैठकीत निवडणूक लढवण्याच्या निर्णय घेण्यात आला. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांना उमेदवार करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे.

Uddhav Thackeray
Shivsena News: धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा? लेखी स्वरुपात म्हणणं सादर करण्याची मुदत संपली,आयोग काय निर्णय देणार?

रविवारी झालेल्या बैठकीनंतर पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती. पण शिवसैनिकांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे महाविकास आघाडीत कसबा विधानसभेची जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आली आहे. कॉंग्रेसकडूनही या जागेवर उमेदवार देण्याची शक्यता आहे. पण त्यापुर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या कसबा विधानसभेवर अप्रत्यक्ष दावा केला होता.

त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या गटाने तर थेट उमेदवारच जाहीर केल्याने कॉंग्रेस आणि ठाकरे गटात यावरुन वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आठ दिवसांपुर्वी विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनीदेखील कसबा विधानसभेवर अप्रत्यक्ष दावा केला होता.

Uddhav Thackeray
Ranjeet Patil News : भाजप उमेदवार रणजीत पाटलांवर गुन्हा दाखल

कसबा विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षाची सर्वाधिक ताकद आहे त्या पक्षाला ती जागा मिळावी, अशी आमची भूमिका आहे. महाविकास आघाडीत कसबा विधानसभा मतदार संघाची जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे. त्या जागेवर काँग्रेस उमेदवार देण्याची शक्यता आहे. पण याच माध्यमातून कसबा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची अधिक ताकद असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगत पवार यांनी कसबा विधानसभा मतदारसंघावर देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com