TET Exam Scam : टीईटी गैरव्यवहारात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांचा सहभाग ?

अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांमध्येच त्यांच्या तीनही मुली, आणि मुलगा नोकरीला असल्याचे सांगण्यात आले.
MAHA TET Exam
MAHA TET Examsarkarnama

पुणे : TET Exam Scam : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी काही दिवसापूर्वी कारवाईचे आदेश देण्यात आले होते. 2019-2020 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी पुण्यात सायबर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता या टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी आता एका मंत्र्याचे नाव समोर आले आहे. (TET Exam Scam Abdul Sattar latest news)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणाचे कनेक्शन आता सिल्लोडपर्यंत पोहचले आहे.

या टीईटी घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलाचाही सहभाग असल्याचे समजते. या चारही जणांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. हीना सत्तार, उजमा सत्तार, हुमा फरहीन सत्तार, आमेर सत्तार अशी सत्तार यांच्या मुलांची नावं आहेत.

हिना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली आहेत. 2020 मध्ये त्या अपात्र आहेत, सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोन्ही मुलींचा समावेश आहे. माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहे.

MAHA TET Exam
Dr Heena Gavit Accident : भाजप खासदार हीना गावित यांच्या गाडीला अपघात ; थोडक्यात बचावल्या

महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पैसे दिले होते. मात्र सुपे यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे सर्टिफिकेट मिळाले नाहीत. ऊजमा आणि हिना यांनी कुठल्या एजंटला पैसे दिले हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे.

या यादीमध्ये संभाजीनगर जिल्हय़ातील काही उमेदवारांचा समावेश आहे. यादी जाहीर झाल्यानंतर गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची नावेही समोर आलेली आहेत

अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांमध्येच त्यांच्या तीन मुली, आणि मुलगा नोकरीला असल्याचे सांगण्यात आले.

शिक्षक परीक्षा घोटाळ्यात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या घोटाळ्याची व्यप्ती तब्बल 240 कोटी रुपयांची असल्याचे पोलीस तपास उघड झाले आहे. प्रत्येक परीक्षार्थ्यांकडून तीन ते चार लाख रुपये घेतले असल्याचेही तपासात समोर आले आहे. परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे आणि सुशील खोडवेकर यांच्यासह याप्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे. शिक्षक परीक्षा घोटाळ्या प्रकरणात आयएएस सुशील खोडवेकर याच्या अडचणीत वाढ झाली असून, त्याचा अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com