टीईटी परीक्षा : अश्‍विनकुमारला मिळाले तब्बल पाच कोटी ३७ लाख

सुपे यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Tukaram Supe
Tukaram SupeSarkarnama

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) गैरव्यवहारातील अनेक गोष्टी आता समोर येऊ लागल्या आहेत. परीक्षा घेणाऱ्या जी. ए. टेक्नॉलॉजी या कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख आणि शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या सांगण्यावरून या कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विनकुमार शिवकुमार (Ashwinikumar Shivkumar) याला पाच कोटी ३७ लाख रुपये देण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

Tukaram Supe
गुंड मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश; भाजपाचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार

याप्रकरणात अटक करण्यात आलेले एजंट संतोष हरकळ (वय ४२, रा. औरंगाबाद) व अंकुश हरकळ (वय ४२, रा.सिंदखेडराजा, बुलढाणा) यांनी नाशिक, जळगाव, जालना, बुलढाणा जिल्ह्यातील पाच एजंटाकडून हे पैसे जमा केले होते. त्यानंतर डॉ. देशमुख आणि सावरीकर यांच्या सांगण्यावरून ते शिवकुमार याला देण्यात आले. आश्विनकुमार याने टीईटी -२०१८ मधील ६०० ते ७०० परीक्षार्थींचे गुण वाढविण्यासाठी त्यास मिळालेल्या पाच कोटी रुपयांपैकी दोन कोटी जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक गणेशन याला, राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुखदेव डेरे यांना २० लाख रुपये तर शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे यास ३० लाख रुपये दिले.

Tukaram Supe
सोमय्यांचे आव्हान; ठाकरे सरकारने माझी व कुटुंबियांची जरूर चौकशी करावी

सुपे यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात ते नाशिक येथे उपसंचालक पदावर कार्यरत असताना त्यांच्या ओळखीचे दीपक सखाराम व्याळीज यांच्या मुलास परीक्षेत उत्तीर्ण करण्याकरिता व प्रमाणपत्र मिळण्याकरिता त्याने एका अनोळखी व्यक्तीमार्फत व्याळीज यांच्या मुलाचे हॉल तिकीट घेतले व काम झाल्यानंतर दोन ते तीन लाख रुपये देण्यास सांगितल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांडमध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे.

संतोष व अंकुश हरकळ यांच्या तपासा दरम्यान त्यांच्याकडून परीक्षार्थींची यादी व पैसे घेतलेल्यांची यादी मिळून आल्याचा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात करीत आरोपींना सात दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डोलारे यांनी संतोष व अंकुश हरकळ आणि सुपे यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर आरोग्य भरती गट-क परीक्षा पेपरफुटीमधील आरोपी अतुल राख याला देखील २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुचविण्यात आली आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com