
Devendra Fadnavis in Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नुकतंच प्रकाशित झालेल्या 'लोक माझे सांगाती' या सुधारित आवृत्तीच्या पुस्तकाचा आधार घेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी पुस्तकाचे वाचन करत ठाकरेंवर दहा टीकेचे बाण सोडले आहेत. फडणवीस आज पुण्यात भाजपच्या कार्यक्रमात बोलत होते.
फडणवीस म्हणाले, आता एक पुस्तक आलंय, अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे, लोक माझे सांगाती. या पुस्तकाच्या पान क्र. ३१८ व ३१९ यामध्ये जे लिहलेलं आहे, त्यातली दहा वाक्ये सांगतो. वज्रमुठीचे प्रमुख शरद पवार हे वज्रमुठीचे चेहरा उद्धव ठाकरेंबद्दल भाष्य केले आहे, असे म्हणत फडणवीसांनी या पुस्तकाचे वाचन केले.
फडणवीसांनी पुस्तकातले काही मुद्दे वाचले. फडणवीस म्हणाले, "हिंदूह्रदयस्रम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतीची संवादाची सहजता, उद्धव ठाकरे यांच्यासोबत नव्हती. ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी नसे, जी एका मुख्यमंत्र्यांकडे असायला हवी होती. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल, याची कल्पनाच आम्हाला आली नव्हती. त्यांचं कुठे काय घडतंय, याकडे लक्ष नसे. उद्या काय होईल, याचा अंदाज असायला हवे, ही क्षमता त्यांच्याकडे नव्हती. त्यानुसार काय पावलं उचलायची, याची राजकीय चातुर्य असायला हवं, आम्हाला जाणवत होती, असे शरद पवार यांनी ठाकरेंबद्दल पुस्तकात लिहलेलं आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "ठाकरेंना अनुभव नसल्याने हे सगळं त्यांना जमत नव्हंत, काही गोष्टी त्यांना टाळचा येणं जमलं नाही. महाविकास आघाडी सरकार कोसळताना पहिल्याच टप्प्यात त्यांनी संघर्ष न करताच माघार घेतली. ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते, पण ऑनलाईन. टोपे, अजितदादा इतर मंत्री प्रत्यक्ष संपर्कात होते. ठाकरेंचे फक्त दोन वेळा मंत्रालयात जाणे, हे आमच्या पचनी पडणारे नव्हते," असा पुस्तकातील उतारा फडणीसांनी वाचून दाखवत ठाकरेंना लक्ष्य केले.
"आता हे मी वाचून दाखवलेली दहा वाक्ये मी म्हंटले आहे का? ते शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हंटले आहे. हेच आम्ही उद्धव ठाकरेंबद्दल बोलत होतो. तेव्हा आम्हाला ते महाराष्ट्र द्रोही ठरवत होते. वज्रमुठीचे प्रमुख शरद पवार हे वज्रमुठीचे चेहरा उद्धव ठाकरेंबद्दल (Uddhav Thackeray) हे दहा वाक्य बोलले आहेत, त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी आभार," असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना चिमटा काढला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.