अजितदादा सांगा; ५४ जणांची यादी शरदरावांच्या ड्रॉवरमधून चोरून राज्यपालांना देणे नैतिकतेत बसते?

संभाजीराजेच काय अगदी शरद पवार यांनी यांनी विषयात आंदोलन केले तरी त्यास आम्ही पाठिंबा देऊ
patil-pawar.jpg
patil-pawar.jpg

पुणे : जुना विषय उकरून काढू नका असं सांगणाऱ्या अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या ५४ आमदारांची यादी शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून चोरून आणून राज्यपालांच्या कार्यालयाकडे दिली हे महाराष्ट्राच्या नैतिकेत बसते का? असा प्रश्‍न भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात केला. पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी अजित पवार यांनी मला शिकवू नये. ते ज्या भाषेत बोलतील त्याच भाषेत त्यांना उत्तर दिले जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला.(Tell Ajit Pawar; Is it in the morality of Maharashtra to steal the list of 54 people from Sharad Pawar's drawer and give it to the Governor?)

सर्वजण झोपेत असताना हे सरकार पडेल असं मी म्हटलं होते. त्यात अजित पवार यांना वैयक्तिक काहीच म्हटलेले नव्हते. त्यांना राग येण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र, त्यावरून ते मला बोलत असतील तर मी त्याचे उत्तर त्यांना त्याच भाषेत देण्यात काय गैर आहे, असा प्रश्‍न पाटील यांनी केला.पीएमपीएमएलच्या संचालकपदाचा राजीनामा हा पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे नगरसेवक शंकर पवार यांनी दिला होता. त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. राजीनामा कुणाकडे द्यायचा हा तांत्रिक भाग होता. त्यावरून चर्चा आणि राजकारण करण्याचे कारण नाही, असे पाटील यांनी सांगितले.

खासदार छत्रपती संभाजीराजे आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारले तर त्यात भाजपाचे कार्यकर्ते सहभागी होतील. संभाजीराजेच काय अगदी शरद पवार यांनी यांनी विषयात आंदोलन केले तरी त्यास आम्ही पाठिंबा देऊ कारण मराठा आरक्षण या विषयात आम्हाला राजकारण करायचे नाही. मात्र, राज्य सरकार सर्वच पातळ्यांवर वेळकाढूपणा करीत आहे.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊन अनेक दिवस उलटले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात पुर्नविचार याचिका दाखल करण्यास राज्य सरकार वेळकाढूपणा का करीत आहे हा आमचा प्रश्‍न आहे.

महाापलिका निवडणुकीसाठी मुंबई वगळता इतर ठिकाणी दोन सदस्यीय प्रमाग रचना करण्याचे वैयक्तिक मत उमपुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. त्यावर विचारले असता, पाटील म्हणाले, ‘‘ प्रभाग रचना करण्याची एक प्रक्रिया आहे. फडणवीस सरकारच्या काळात प्रभाग रचना बदलण्याचा विषय आला तेव्हा समिती नेमली समितीने योग्य तो निर्णय घेतला. आता अजित पवार एकटेच कसे काय निर्णय घेऊन शकतात.मात्र, त्यांना हवा तर ते प्रभाग एकचा काय अर्धा किंवा पावचादेखील करू शकतात, अशी खोचक प्रतिक्रिया दिली.
Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com