महिला तहसीलदाराला ‘ऑनलाइन’ लाच घेण्याचा आग्रह ! मग पुढे घडले ते असे...

काही महिन्यांपूर्वीच कोलते यांची हवेली तहसीलदारपदावर नियुक्ती झाली आहे.
महिला तहसीलदाराला ‘ऑनलाइन’ लाच घेण्याचा आग्रह ! मग पुढे घडले ते असे...
kolte trupti.jpg

पुणे : वाळूचा पकडलेला ट्रक सोडण्यासाठी हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते (Trupti Kolte) यांना ऑनलाइन पन्नास हजार रूपयांची लाच देण्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात कोलते यांनी खडक पोलीस ठाणे तसेच (एसीबी) कडे तक्रार केली आहे.(Tehsildar of Haveli reveals 'online' bribery) 

सोलापूर रस्त्यावरील शेवाळेवाडी येथे प्रवासात असताना कोलते यांना बस डेपोशेजारी वाळू वाहतूक करणारा ट्रक दिसला. त्यांनी या ट्रकला बाजूला घेतले. मात्र, ट्रकचालक चावी घेऊन पळून गेला. त्यानंतर कोलते यांनी हडपसरच्या मंडलाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली.तातडीने तलाठी किंवा कोतवालास पाठविण्याची सूचना केली.

 कोतवाल जागेवर येईपर्यंत कोलते स्वतष ट्रकजवळ बसून राहिल्या. कोतवाल तेथे येताच. ट्रकचा पंचनामा करण्याच्या सूचना करून त्या पुण्याकडे निघाल्या. मात्र, त्याचवेळी ट्रकचा मालक तेथे आला व पैसे देण्याचे आमिष दाखवू लागला. कोलते यांनी त्यास खडसावले. तरीही तो तहसीलदार कोलते यांचा पाठलाग करीत होता. ती व्यक्ती सातत्याने कोलते यांना फोन करीत होती.

 पुण्यात आल्यानंतर बैठकीत असल्याने त्यांना फोन घेता आला नाही. काही वेळानंतर आलेला फोन कोलते यांनी घेतला. त्यावेळी समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने तुमच्या बँक खात्यात पन्नास हजार रूपये टाकण्यात ट्रक मालकाने सांगितले असून त्यानुसार पैसे टाकल्याचे कोलते यांना सांगितले.त्यावर कोलते त्या व्यक्तीवर संतापल्या व त्यांनी खडक पोलीस ठाणे तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) जबरदस्तीने लाच देण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली. 

 काही महिन्यांपूर्वीच कोलते यांची हवेली तहसीलदारपदावर नियुक्ती झाली आहे. या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला तहसिलदार आहेत.
Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in