‘तानाजी सावंत कळीचे नारद, ते शिवसैनिक नाहीत’ : शिवसैनिकांनी पुण्यातील कार्यालय फोडले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुक्रवारी झालेल्या पदाधिकारी बैठकीनंतर पुण्यातील शिवसैनिकांनी अखेर सावंत यांना ठाकरी बाणा दाखविला.
Tanaji Sawant's office
Tanaji Sawant's officeSarkarnama

पुणे : बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविषयी आता शिवसैनिकांकडून (Shiv Sainik) संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. कोल्हापुरात राजेश क्षीरसागर यांच्या घरावर शुक्रवारी शिवसैनिकांनी मोर्चा काढला होता, तर आज आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे पुण्यातील (Pune) कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी फोडले. सावंत यांच्याविषयी अत्यंत संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. कार्यालय फोडल्यानंतर शिवसैनिकांनी त्या ठिकाणी सावंत गद्दार आहेत, अशी वाक्येही लिहिली आहेत. (Tanaji Sawant's office in Pune was blown up by Shiv Sainiks)

तानाजी सावंत कळीचे नारद असून ते खरे शिवसैनिक नाहीत, असे पुण्यातील शिवसैनिकांनी माध्यमाशी बोलताना सावंतावर रोष व्यक्त केला. सध्याच्या ज्या घडामोडी घडत आहेत, त्यामध्ये आमदार तानाजी सावंत यांचा मुख्य रोल आहे, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी केला आहे.

Tanaji Sawant's office
मोठी बातमी : शिंदे गटाचं नाव ठरलं ; ' शिवसेना बाळासाहेब' असे नामकरण

आमदार तानाजी सावंत यांच्या आंबेगाव बुद्रुक येथील कार्यालयात घुसून शिवसैनिकांनी ही तोडफोड केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुक्रवारी झालेल्या पदाधिकारी बैठकीनंतर पुण्यातील शिवसैनिकांनी अखेर सावंत यांना ठाकरी बाणा दाखविला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधल्यानंतर राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिंदे यांच्या बरोबर जाणाऱ्या आमदारांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. प्रारंभी कोल्हापूर आणि त्यानंतर माहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्याचे पडसाद शनिवारी सकाळी पुण्यातही उमटले.

Tanaji Sawant's office
आमच्या कुटूंबियांची जबाबदारी तुमच्यावर; शिंदेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान, कुर्ला आणि चांदिवली या विधानसभा मतदारसंघातील आमदार दिलीप लांडे आणि मंगेश कुडाळकर यांचे बॅनर शिवसैनिकांनी मोर्चा काढत फाडले.शिवसेना आमदार दिलीप लांडे यांचे चांदिवलीमध्ये लावण्यात आलेल्या बॅनर्सला संतप्त शिवसैनिकांनी मोर्चा काढून काळे फसले, तर माजी नगरसेवकांनी साकीनाका चौकात लागलेले दिलीप लांडे यांचे बॅनर्स फाडण्यात आले.

Tanaji Sawant's office
गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये आता राष्ट्रवादीची एन्ट्री ; सेनेच्या आमदारांवर नजर, चर्चांना उधाण

कुर्ला येथील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर हे देखील एकनाथ शिंदे गटात काल सामील झाल्याने शुक्रवारी शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त करत मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केली. घटनास्थळी पोलिस कर्मचारी उपस्थित होते. मात्र, शिवसैनिकांनी कार्यालयावरील फलक तोडून नुकसान केले. आमदार मंगेश कुडाळकर यांच्याविरोधात शिवसैनिकांकडून मोर्चा काढण्यात आला.

Tanaji Sawant's office
आमच्या झमेल्यात पडू नका, जे पहाटे झालं ते आता सायंकाळी होईल ; राऊतांचा सल्ला

या वेळी कुडाळकर यांचा पोस्टर तयार करून या पोस्टरवर गद्दार मंगेश कुडाळकर लिहिण्यात आले. या मोर्चामध्ये हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती लावत कुडाळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच नेहरू नगर येथील बाळासाहेब ठाकरे समाजकेंद्र व पक्ष कार्यालयही शिवसैनिकांनी ताब्यात घेतले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in