राज्यातील ‘ती बाब’ अमित शहांच्या निदर्शनास आणून देणार : सुप्रिया सुळे

ईडी, सीबीआय या महत्वाच्या केंद्रीय संस्था आहेत. राष्ट्रीय सुरक्षेशी या संस्था संबंधित आहेत, असे असतानाही त्यांच्या कारवाईची माहिती अगोदरच बाहेर जात असेल तर ही बाब अत्यंत चिंताजनक आहे
Amit Saha-Supriya Sule
Amit Saha-Supriya SuleSarkarnama

बारामती : ‘‘देशात जेव्हा एखादा पेपर फुटतो, तेव्हा त्याची चौकशी केली जाते. महाराष्ट्रात सातत्याने ईडी, सीबीआय किंवा इतर केंद्रीय एजन्सीबाबतची संवेदनशील माहिती एखादी व्यक्ती जेव्हा अगोदरच देते, या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. याबाबत दिल्लीला गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या निदर्शनास ही बाब मी आणून देणार आहे,’’ असे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बारामतीत माध्यमांशी बोलताना सांगितले. (Talks to Amit Shah about leaking sensitive information of central agencies : Supriya Sule)

राज्यातील काही नेते अगोदरच ईडी किंवा प्राप्तीकर विभाग यासारख्या केंद्रीय यंत्रणा काय कारवाई करणार, हे कसे काय जाहीर करतात, असा प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी वरील विधान केले. त्या म्हणाल्या की, ईडी, सीबीआय या महत्वाच्या केंद्रीय संस्था आहेत. राष्ट्रीय सुरक्षेशी या संस्था संबंधित आहेत, असे असतानाही त्यांच्या कारवाईची माहिती अगोदरच बाहेर जात असेल तर देशाचे ऐक्य व सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत चिंताजनक आहे, त्यामुळे ही बाब मी केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या लक्षात आणून देणार आहे.

Amit Saha-Supriya Sule
सहकार विभागाचा पेनड्राईव्ह दरेकरांकडे! बाळासाहेब म्हणाले, काळजीचे कारण नाही...

विकासाच्या मुद्यावर समविचारी पक्षांनी एकत्र येण्याने राज्याचे चांगले होणार असेल तर ही बाब चांगलीच आहे, असे विधान खासदार सुळे यांनी महाविकास आघाडीबरोबर युती करण्यास तयार असल्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांच्या ऑफरवर केले.

Amit Saha-Supriya Sule
Rajesh Tope : आम्ही शाळेपासूनचे मित्र; सांत्वनपर भेटीतील ही अनौपचारिक चर्चा ..

राज्यातील 25 आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. त्या बाबत बोलताना सुळे यांनी सांगितले की, सध्या लोकसभेचे कामकाज सुरु आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. चहापासून मॅगीपर्यंत अनेक गोष्टींच्या किंमती वाढल्या आहेत. देशातील लोकांपुढे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, त्यांच्याकडे मी जास्त लक्ष देते, सरकार पाडण्याबाबत मला फार काही बोलायचे नाही.

Amit Saha-Supriya Sule
जुन्या पेन्शनसंदर्भात कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू : पवारांचे शिक्षकांना आश्वासन

देवेंद्र फडणवीस यांनी ‘उत्तरप्रदेश झाँकी है; महाराष्ट्र अभी बाकी है’ असे विधान केले होते. त्या बाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विरोधी पक्षांनी अशा घोषणा करणे महत्वाचे असते. विरोधकांनाही आमदारांसह सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी अशा घोषणा कराव्या लागतात. त्यात काही गैर आहे, असे मला तरी वाटत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com