अजितदादा, तुम्ही भावासारखे; एकुलत्या एका मुलाला आमच्यापासून हिरावून नेणारांना सोडू नका

या पुढे अशा घटना होता कामा नये
AjitPawar-Chopda Family
AjitPawar-Chopda FamilySarkarnama

शिरूर (जि. पुणे) : काही ठिकाणी, काही अविचारी तरूण कायदा हातात घेण्याचा, अशांतता माजवण्याचा प्रयत्न करताहेत. अशा तरूणांना आवरताना तो कुठल्या गटाचा, पक्षाचा किंवा कुणाच्या घरातील आहे हे पाहू नका, त्याच्याविरूद्ध कडक ॲक्शन घ्या, अशी ताकीद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पोलिस दलाला दिली. (Take strong action against youth who take law their hands : Ajit Pawar)

शिरूर येथील तरूण बांधकाम व्यावसायिक आदित्य संदीप चोपडा (वय २४) याच्या संशयास्पद मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पवार यांना आज शहरातील अनेक संघटनांनी निवेदने दिली. हा खुनाचा प्रकार असून, हल्लेखोरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. या दरम्यान, पवार यांनी आदित्यच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार ॲड. अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल त्यांच्यासमवेत होते.

AjitPawar-Chopda Family
‘वर्षा’बाहेर अर्धा तास बसलेल्या भावना गवळी रिकाम्या हातांनी परतल्या

आदित्यचे वडील संदीप, आई छाया, बहिण दिशा व मामा मोहनलाल चंगेडीया व अतुल चंगेडीया यांनी अजितदादांसमोर भावना व्यक्त केल्या. 'दादा, तुम्ही माझ्या भावासारखे आहात, माझ्या एकुलत्या एका मुलाला आमच्यापासून हिरावून नेणारांना सोडू नका', असा आर्त टाहो आदित्यच्या आईने फोडल्यावर पवार यांनाही गहिवरून आले. त्यांनी तातडीने नगरचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील व पुण्याचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणाचा तातडीने छडा लावण्याचे आदेश दिले.

AjitPawar-Chopda Family
कार्यक्रमाला पावणेसातला येणार म्हटल्यावर तो म्हणाला, सकाळच्या की संध्याकाळच्या?

आज आदित्य गेला, पण पुढे अशा घटना होता कामा नये, असा सज्जड दम अजितदादांनी पोलिस दलाला दिला. कुठल्याही प्रकाराबद्दल कुणाच्या काही तक्रारी असतील तर पालकमंत्री म्हणून मला सांगा, असा दिलासा देत ते म्हणाले, शिरूर शहरातील सर्व समाजबांधव गुण्यागोविंदाने एकत्र राहात असताना त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांची आहे. अशा प्रकारांतून शांतता भंग करण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर त्यांची पाळेमुळे खणून काढा. कायदा सुव्यवस्था कायम राखण्याला प्राधान्य देताना शहराच्या चांगल्या वातावरणाला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असेल, शहरात बकालपणा आणण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल, बेकायदेशीर गोष्टी करीत असेल तर त्याला सोडू नका.

आदित्य चोपडा याची हत्या झाल्याचा त्याच्या कुटुंबाचा दावा असल्याने त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा व हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना जरब बसेल, अशी शिक्षा करावी, असे आदेशही अजित पवार यांनी दिले. ते म्हणाले, चुकीच्या प्रवृत्ती फोफावताना पोलिस दल सक्षम झाले पाहिजे. एमआयडीसीतील चुकीची ठेकेदारी, वाळूमाफीया यांचा बंदोबस्त करा. दारूभट्ट्या किंवा वेगळे चुकीचे व्यवसाय कुणी करीत असेल तर त्यांचा बिमोड करा. तुम्हाला सर्व साधनसामग्री आम्ही पुरवू. तुम्ही चांगले काम करा, तुम्हाला अधिकाधिक सुविधा देऊ. गृहपकल्प राबवू, चांगली वाहने उपलब्ध करून देऊ. पण एवढे सांगितल्यानंतरही यंत्रणा गतीने हलणार नसेल आणि त्याबाबत पुन्हा माझ्याकडे तक्रार येणार असेल तर मग मी सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com