भोंगे उतरवा; अन्यथा पोलीस ठाण्यांसमोरच हनुमान चालिसा

पुणे शहर मनसेच्यावतीने (MNS) आज पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांना निवेदन देण्यात आले.
MNS Pune
MNS PuneSarkarnama

पुणे : सर्वोच्च्य न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार शहरातील सुमारे साडेचारशे मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरविण्याची कार्यवाही पुणे पोलिसांनी करावी. ही कारवाई तातडीने करण्यात यावी. अन्यथा पोलीस ठाण्यांसमोर हनुमान चालीसा म्हणत आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) आज दिला.

MNS Pune
'ग्लोबल टीचर' डिसलेंचा पाय खोलात; जिल्हा परिषदेनेच केला गुरुजींच्या निषेधाचा ठराव

शहर मनसेच्यावतीने आज पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांना निवेदन देण्यात आले. अजानला आमचा विरोध नाही. परंतु भोंग्यांद्वारे अजान नको, असेही मनसेने या निवेदनात म्हटले आहे. पोलीस आयुक्त गुप्ता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘ भोंगे हा सामाजिक विषय आहे. मशिंदीच्या जवळ राहणाऱ्या रहिवाशांना भोंग्यांचा त्रास होतो, याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिसांनी करावी, अशी आमची भूमिका आहे. मशिदींच्या मौलवींनी कायदा- सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांच्याच मध्यस्थीने पोलिसांना लेखी स्वरूपात ग्वाही देऊन कळवावे की, आमच्या मशिदीवरून अजान केली जाणार नाही.’’

MNS Pune
'हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा : म्हणत, चंद्रकांतदादांचे आघाडीला उत्तर

मशिदींमधील मौलवींकडून या पद्धतीने ग्वाही मिळाल्यास धार्मिक अथवा सामाजिक तेढ निर्माण होणर नाही. त्याची दखल पोलिसांनी घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी, अन्यथा पोलीस ठाण्यांसमोर हनुमान चालिसा म्हणावी लागेल, या निवेदनात म्हटले आहे. या निवदेनात मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे, प्रवक्ते हेमंत संभूस, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रदेश उपाध्यक्ष रणजित शिरोळे, बाळा शेडगे, आदींच्या स्वाक्षरी आहेत.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुण्याला भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ठाकरे पुण्याकडे अचानकपणे कशासाठी येत आहेत याबाबत खुद्द मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये अनभिज्ञता आहे. उद्या सकाळी ठाकरे पुण्यात येत असल्याची माहिती पुण्यातील माध्यमात आज सायंकाळी चर्चिली जात आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in