Pimpri-Chinchwad : कोरोना असतानाच 'स्वाईन फ्लू'ही परतला; पिंपरी-चिंचवडमध्ये गेला पहिला बळी

AH3N2 : कोरोनानंतर आता `स्वाईन फ्लू` चा सुद्धा आला नवा अवतार, प्रशासन झाले सतर्क
AH3N2
AH3N2 Sarkarnama

पिंपरी : कोरोना तथा कोविड या जागतिक साथीचे संकट पूर्ण टळले नसतानाच २००९ मध्ये भारतात आलेला स्वाईन फ्लू H1N1 या जुन्या जागतिक आजाराचा नवा विषाणू AH3N2 आता आला आहे. त्याने पिंपरी-चिंचवडमध्ये आज पहिला बळी गेल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

कोरोनासारखाच स्वाईन फ्लू हा सुद्धा संसर्गजन्य आजार असून दोन्ही आजारांची लक्षणे एकसारखीच आहेत. मात्र, कोरोनाचा नवा विषाणू जसा कमी तीव्रतेची लक्षणे व जीवघेणा नव्हता, तसाच स्वाईन फ्लूचाही असल्याने प्रशासनाने काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे.

AH3N2
Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी मोदी-शहांकडे वजन वापरा...

तरीही काळजी घेण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळून गेलात, तर मास्क वापरण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड पालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा वैद्यकीय विभागप्रमुख डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

नव्या स्वाईन फ्लूच्या साथीने निधन झालेले ७३ वर्षीय वृध्दाला ह्रदय आणि फुफ्फुसाचाही आजार होता, असे त्यांनी सांगितले. शहरात या आजाराचे यावर्षी आतापर्यंत चार रुग्ण असून त्यातील तीन बरे असल्याने सध्या रुग्णालयात कोणीही उपचार घेत नसल्याची माहिती त्यांनी दिली.

AH3N2
Budget Session : मी मुद्दा सोडून बोलत नाही...बाळासाहेब पाटलांनी देसाईंना सुनावले

दरम्यान, राज्यात नव्या स्वाईन फ्लू ने नऊ बळी गेले आहेत. तसेच त्याचे रुग्णही वाढत असल्याने पिंपरी पालिका प्रशासन सावध झाले आहे. त्यांनी आपल्या पाच रुग्णालयातील प्रत्येकी दहा अशा पन्नास खाटा या खास या रुग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत.

नव्या आजाराने घाबरून न जाण्याचे तसेच सर्दी, खोकला, घसादुखी, ताप ही लक्षणे असल्यास त्वरीत नजीकच्या पालिकेच्या दवाखाना/ रुग्णालयामधील डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या आजारावरील औषधोपचार उपलब्ध असल्याचा खुलासाही प्रशासनाने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com