Rahul Gandhi : राहुल गांधींच्या विरोधात शिंदे गट आक्रमक ; पुणे, ठाण्यात आंदोलन

Rahul Gandhi : ठाण्यातही आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
Shinde group, pune
Shinde group, punesarkarnama

Rahul Gandhi : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. यावरुन शिंदे गटाने पुणे, ठाण्यात आंदोलन सुरु केले आहे.

पुण्यातील सावरकर चौकात शिंदे गटाकडून राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी सावरकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून शिंदे गटाने राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या, यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. ठाण्यातही आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

Shinde group, pune
Shiv Sena : 'भाजपने ढोंगाशी ‘निकाह’ लावून सरकार बनवलं, शिंदेंसमोर सत्तेची हाडके ; ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवावी. हे राज्य कायद्याचं आणि सावरकरांचं आहे असं दाखवून देऊया, असं ठाकरे गटात सामील झालेले खासदार राहुल शेवाळे म्हणाले आहेत. राहुल गांधीच्या वक्तव्याविरोधात कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करावं, असं आवाहन देखील त्यांनी केलंय.

सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना जाऊन मिठी मारणाऱ्या आदित्य ठाकरेंचं शुद्धीकरण नक्की कसं करणार? असा सवाल ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी विचारला आहे. “शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली देऊन राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याबद्दल युवराजांना या पापातून मुक्त करण्यासाठी गोमुत्राने अंघोळच घालावी लागेल”, असा टोला म्हात्रे यांनी लगावला आहे.

राहुल गांधी काय म्हणाले होते..

“एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. वाशिमच्या मालेगावात क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी सावरकरांनी अनेकवेळा इंग्रज सरकारला माफीची पत्रे लिहिली, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com