साखर आयुक्तांसोबत स्वाभिमानीची एकरकमी एफआरपीची बैठक निष्फळ

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Sanghatna) आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा
Swabhimani Shetkari Sanghatna- Sakhar Ayukt Baithak
Swabhimani Shetkari Sanghatna- Sakhar Ayukt Baithak

पुणे : सांगली-सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatna) एकरकमी एफआरपीच्या मागणीच्या आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. मात्र अद्याप या प्रश्नावर कोणताही तोडगा निघालेला नाही. ऊस शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर तोडगा काढण्यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांनी मंगळवारी (१६ नोव्हेंबर) साखर संकुल पुणे येथे बैठक आयोजित केली होती. मात्र एकरकमी एफआरपीबाबत कुठलाही ठोस तोडगा न निघाल्याने ही बैठक निष्फळ ठरली.

दुसरीकडे साखर कारखानदारही या बैठकीला आले नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही संताप व्यक्त केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्ह्यात एक रकमी एफआरपीसाठी पुकारलेल्या आंदोलन अधिच तीव्र झाले आहे. ऊस शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दोन वेळा साखर कारखान्यांवर मोटर सायकल रॅली काढल्या.

Swabhimani Shetkari Sanghatna- Sakhar Ayukt Baithak
पेट्रोल, डिझेलवर सेस वाढून केंद्राने राज्याचे ३० हजार कोटी हडपले

त्यानंतर तासगाव, वाळवा, पलूस आणि कडेगाव तालुक्यात ट्रॅक्टर पंक्टर करणे, हवा सोडणे, ऊस तोड थांबविणे आणि ट्रॅक्टर पेठवण्यात आले. या शिवाय सातारा जिल्ह्यातही अशीच आंदोलने संघटनेकडून करण्यात आली. त्याबाबत आजच्या बैठकीत ठोस उपाययोजना होतील अशी अपेक्षा या बैठकीवेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांना व्यक्त केली होती. मात्र कारखानदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या मागण्यावर कालही कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे या पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महेश खराडे यांनी दिला आहे.

साखर कारखानदारांना शेतकऱ्यांचे हीत पहायचे नसेल तर होणाऱ्या नुकसानीला स्वाभिमानी जबाबदार राहणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे. या बैठकीत साखर उतारा चोरी, वजन काटामारी आणि तोडणीसाठी द्यावे लागणारे पैसे याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्तांना धारेवर धरले.

या बैठकीवेळी तासगाव, नागेवाडी साखर कारखान्याच्या थकीत बिलाबाबत चर्चा झाली. तसेच डोंगराईच्या केन ऍग्रो, कारखान्याच्या थकीत बिलाचाही प्रश्न लावून धरला. वसंतदादा साखर कारखान्याच्या 13 - 14 च्या गाळप हंगामातील थकीत बिले, तसेच राजारामबापू, हुतात्मा आटपाडीचा मानगंगा कारखाण्याच्या थकीत बिलाचा विषयही महेश खराडे यांनी उचलून धरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in