
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते १४ जूनला देहुतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदीराचे उद्धघाटन होणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याला दोनच दिवस बाकी असताना पुण्यामध्ये (Pune) भवानी पेठ मधील विशाल सोसायटीमध्ये एक संशयित स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे पुणे शहरात खळबळ निर्माण झाली आहे.
भवानी पेठेतील विशाल सोसायटी मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 306 मध्ये हा संशयित स्फोट बझाला आहे. स्फोटाच्या तिव्रतेने फ्लॅट मधील खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. फ्लॅटमध्ये झालेला स्फोट इतका भीषण होता की, या स्फोटाचा आवाज संपूर्ण सोसायटीमध्ये ऐकायला गेला.
त्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी लागलीच पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी राशद शेख या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल आहे. मागील दोन-तीन तासापासून पुणे पोलिस राषद शेख नावाच्या व्यक्तीकडे कसून चौकशी करत आहेत. राशद शेख कडे काही सिमकार्ड आणि पासपोर्ट सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले.
फ्लॅट धारक वॉशिंग मशीन, ओव्हन रीपेरींग चे काम करतो. पोलिसांनी शेख यांना ताब्यात घेतले असून फ्लॅट मधून काही सिम कार्ड आणि पासपोर्ट देखील जप्त केल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट वॉशिंग मशीन रिपेअर करताना झाल्याचे समजत आहे. संशयित व्यक्तीकडे पोलिस कसून चौकशी करत आहेत.
मात्र, पोलिसांनी याविषयी काहिही माहिती दिलेली नाही. आम्ही तपास करत आहोत, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र, राशद शेख हा गेल्या दहा वर्षापासून या सोसायटीत राहायला आहे. सध्या तो सोसायटीमध्ये एकटाच राहत असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन मुस्ताक अहमद यांनी दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.