Sushma Andhare On MLA Bangar: "त्यांचं नाव भानगड बाबा असं ठेवावं वाटतंय"

Santosh Bangar : सुषमा अंधारे यांनी उडवली आमदार संतोष बांगर यांची खिल्ली
Santosh Bangar, Sushma Andhare
Santosh Bangar, Sushma AndhareSarkarnama

Sushma Andhare On Santosh Bangar : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) कोणत्या ना कोणत्या वादातून सतत चर्चेत येत असतात. राग अनावर झाला की त्यांनी अधिकाऱ्यांवर हात उचलले आहेत. अशा घटनांमुळे ते वारंवार वाद ओढावून घेतात. आता त्यांनी एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहण केली आहे. त्या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. त्यांच्या या कृत्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी खिल्ली उडविली आहे.

हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यानंतर ते विविध वादातून राज्यात कायम चर्चेत राहिले आहेत. छोट्या-मोठ्या कारणातून त्यांनी अधिकाऱ्यांना मारहण केली आहे. त्यातच आता एका महाविद्यालयाच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Santosh Bangar, Sushma Andhare
Santosh Bangar News : सरकारमध्ये असलो म्हणून काय आम्ही बांगड्या भरल्यात का ?

याबाबत पुण्यातील पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावर अंधारे म्हणाल्या, "संतोष बांगर यांचे नाव मला संतोष भानगड बाबा असं ठेवावं वाटतंये." यानंतर त्यांनी बांगर यांच्याबाबत जास्त बोलणे टाळले.

दरम्यान बांगर यांच्या कृत्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, "आमच्यासाठी खासदार, आमदार आणि नागरीक सारखेच आहेत. या प्रकरणी गृहमंत्रालय योग्य ती कारवाई करेल. बांगर सत्ताधारी पक्षाचे आमदार असून त्यांनी संयम राखला पाहिजे."

Santosh Bangar, Sushma Andhare
Sarkarnama Exclusive : अमित शहांची शिंदे-फडणवीस सरकारवर करडी नजर; तीन मंत्र्यांना कामाबाबत विचारला खरमरीत शब्दांत जाब

यापूर्वी बांगर यांनी आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण केली. महावितरणच्या अधिकाऱ्यास फोनवरून धमकाविले आहे. मंत्रालय परिसरातील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली आहे. त्यानंतर आता एका प्राचार्यांना मारहाण केली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत असून, बांगर यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com