Pune : "त्यांचे अन् माझे विचार एकच, आता त्यांना भेटून ओळख वाढवेन"

Sushma Andhare : सुषमा अंधारे यांच्याकडून प्रकाश आंबेडकर यांच्याशी असलेल्या वादावर पडदा
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama

Sushma Andhare : दोन महिन्यांपूर्वी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सुषमा अंधारे यांना ओळखत नाही. तसेच चळवळीच्या ठिकाणी त्यांची भेट झाली नसल्याचे म्हटले होते. आता शिवसेना आणि वंचित यांची आघाडी झाली आहे. या आघाडीचे सुषमा अंधारे यांनी स्वागत करत लवकरच प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे.

Sushma Andhare
Thackeray Vs Shinde : शिवसेना फुटल्यानंतर पहिल्यांदाच शिंदेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे दाखल होणार!

पुण्यातील पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांना भिमशक्ती-शिवशक्ती एकत्र येण्याबाबत, तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते.

त्यावर अंधारे म्हणाल्या की, ''भिमशक्ती-शिवशकी युती झाली ते चांगली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारची टीका केलेली नव्हती. त्यांनी फक्त ओळख नसल्याचे म्हटले होते. त्यांचे आणि माझे विचार एकच आहेत. आता आंबेडकर यांना भेटेल. त्यांच्याशी ओळख वाढवेल'', असं त्या म्हणाल्या.

Sushma Andhare
Chinchwad bye election : "दुःखामुळे घरात राजकीय चर्चाच नसल्याने उमेदवारीचं काहीच ठरलेलं नाही"

पोटनिवडणुकीत शिवसेनेचे काही उमेदवार इच्छूक आहेत. याबाबत विचारले असता अंधारे म्हणाल्या की, ''दोन्ही ठिकाणी आमदारांचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्या ठिकाणी पोटनिवडणुका लागल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त करणं स्वाभाविक असतं, पण निर्णय पक्ष प्रमुख घेतात. त्यामुळे त्यावर बोलणं उचित ठरणार नाही'', असं भाष्य त्यांनी यावेळी केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com