Supriya Sule News: फडणवीसांच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या,''देवेंद्रजी,आपसे...''

Pune News : चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल...
Devendra Fadnavis, Supriya Sule
Devendra Fadnavis, Supriya SuleSarkarnama

Supriya Sule On Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिलं होतं असा आरोप केला होता. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर आता राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनीही देवेंद्र फडणवीसांच्या(Devendra Fadnavis) आरोपाचं खंडन केलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीसांच्या आरोपावर भाष्य केलं. सुळे म्हणाल्या, राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. यावर राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे या परिस्थितीवर त्यांनी बोलायला पाहिजे. पण त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले याचं मला आश्चर्य वाटत आहे.

Devendra Fadnavis, Supriya Sule
Devendra Fadnvis News : मंत्रीमंडळ विस्तार करू, पण योग्यवेळ आल्यावर; इच्छूक पुन्हा गॅसवर..

देवेंद्रजी, आपसे ये उम्मीद न थी असा टोला लगावतानाच सुळे म्हणाल्या, अशा खोट्या नाट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा पुण्यात कोयता गॅंग, धायरीत गोळीबार झाला अशा घटना घडल्या आहेत यावर राज्याचे गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी बोलणं अपेक्षित होतं. त्यांना विनम्र विनंती आहे की, पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. अशी परिस्थिती त्यांनी यावर बोलावे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायला पाहिजे असंही सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी सांगितले.

Devendra Fadnavis, Supriya Sule
Santosh Bangar News : मंत्री केसरकरांचा संतोष बांगरांना गर्भित इशारा, म्हणाले,''आमदार आहे म्हणून कारवाई...''

चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल...

चिंचवड पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया देताना भाजपा कोणाला उमेदवारी देणार हे माहिती नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ही चिंचवड मतदारसंघाची निवडणुका बिनविरोध करण्याविषयी मी तर्कवितर्क लावू शकत नाही असं सुळे म्हणाल्या आहेत. तसेच चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडी निर्णय घेईल. अजित पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल असंही सुळे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते ?

महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) अडीच वर्षांच्या कालावधीत माझ्यावर केसेस टाकण्याचा, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा, मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडेंना देण्यात आले होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला अटकवा असे आदेश महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांना देण्यात आले होते असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in