Supriya Sule : 'जे सत्य तेच दाखवलं पाहिजे : विरोधी सिनेमे खपवून घेतले जाणार नाही'

Supriya Sule : आपण काही इतिहासकारांना बसवूया, यात राजकारण नाही करायचं, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे.
NCP MP Supriya Sule Latest Marathi News
NCP MP Supriya Sule Latest Marathi NewsSarkarnama

पुणे : मागील काही दिवसांपासून ऐतिहासिक चित्रपटांवरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हर हर महादेव या चित्रपटाचे खेळ बंद पाडले होते. यामुळ त्यांना अटक होऊन त्यांना जामीन ही मिळाला होता. शिवरायांच्या इतिहासाचं विकृतीकरण होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावरूनच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिला आहे.

इतिहास हा करमणुकीसाठी नाही, इतिहासाची तोडफोड नको, बांधल कुटूंबाबाबत नेमकं काय दाखवले आहे? हे सर्व सगळ्या इतिहासचे साक्षीदार आहेत, ते छत्रपती शिवाजीराजांशी एकनिष्ठ होते, विश्वासू होते, इतिहासानुसार जे सत्य आहे ते दाखवले पाहिजे, मात्र हा सिनेमा छत्रपती विरोधी आहे. आपण काही इतिहासकारांना बसवूया, यात राजकारण नाही करायचं, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, विरोधी सिनमे खपवून घेतले जाणार नाही, असे परखड मत सुळे यांनी व्यक्त केले.

उद्योगाबाबत मी जे काही वाचलं ते ट्विट केलं, त्यामुळे उद्योग गेले त्यावर बोलले मी कोणावरही टीका केली नाही, जे माध्यमात छापून आलं ते सागितलं. पक्ष वाढीसाठी भाजप प्रयत्न करत आहे, बारामती मध्ये स्वागत आहे. जे येत आसतात ते त्यांचं पक्ष वाढवण्यासीठी प्रयत्न करतात असतात, असेही यावेळी सुळे म्हणाले.

NCP MP Supriya Sule Latest Marathi News
Sanjay Raut : फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो ; मध्यावधीबाबत राऊतांचे स्पष्ट संकेत!

यावेळी सुळे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टिपण्णीवरही भाष्य केले. सुळे यावेळी म्हणाल्या की, बावनकुळे अंधश्रद्धावर बोलतात, अंधश्रद्धेच्या प्रश्नावर ज्यामध्ये दाभोळकर यांना जीव गमवावा लागतो, दुसरीकडे आपल्या वडिलांच्या वयाच्या लोकांना असे बोलले जातंय, ही यांची संस्कृती आहे."

संजय राऊत यांना आता जामीन मंजूर झाला, मात्र राऊत कुटुंबातील लोकांचे ते 103 दिवस कसे गेले असतील? असा प्रश्नही त्यांनी विचारला. राजकारणात सगळं काही दडपशाहीने होत नसतं, सत्ताधारी गटाला माझ्या शुभेच्छा आहेत, असेही सुळे म्हणाल्या.

NCP MP Supriya Sule Latest Marathi News
Bharat jodo Yatra : लोकं एकदा चेहऱ्यावर मतदान करतात पण पुढे...

भारत जो़डो यात्रा महाराष्ट्रात जोरदार सुरूआहे, राहुल गांधी यांना खूप प्रेम, त्यांच्याकडून अपेक्षा जास्त आहेत, लोकांच्या फार अपेक्षा जास्त आहेत, असेही सुळे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com