वादळी ठरलेल्या अधिवेशनात सुप्रिया सुळेंनी केली कमाल

संसदेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सुप्रिया सुळेंनी लक्षवेधक कामगिरी केली आहे.
Supriya Sule 

Supriya Sule 

पुणे : संसदेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) विविध आघाड्यांवर मराठी खासदारांनी लक्षवेधक कामगिरी केली आहे. प्रश्न विचारणे, शून्य प्रहर किंवा विशेष उल्लेखाद्वारे जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्दे मांडणे, खासगी विधेयके, चर्चांमध्ये सहभाग घेणे आणि उपस्थिती या विषयांवर मराठी खासदारी हिवाळी अधिवेशन अक्षरश: दणाणून सोडले होते.

त्यानंतर लोकसभेच्या (Loksabha) हिवाळी अधिवेनापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची यादीही जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनातही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) अव्वल ठरल्या आहेत. अधिवेशनापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची संसदेच्या रेकॉर्डस् मधील नोंदीनुसार 'पीआरएस' या संस्थेने खासदारांची कामगिरी जाहिर केली आहे. या यादीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे अव्वल स्थानावर आहेत.

<div class="paragraphs"><p>Supriya Sule&nbsp;</p></div>
या मराठी खासदारांनी गाजवले संसदेचे अधिवेशन

सुप्रिया सुळे यांनी स्वत ट्विट करत ही यादी शेअर केली आहे. तसेच यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघाचे आभारही मानले आहे. ''लोकसभेच्या अधिवेशनातील उपस्थितीपासून प्रश्नोत्तरे, विविध चर्चांमधील सहभाग, खासगी विधेयके आदींचा प्रकर्षाने उल्लेख करण्यात आला आहे. ही आकडेवारी आपल्या माहितीसाठी शेअर करत आहे.आपण सर्वांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि प्रेम यामुळे हे शक्य झाले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता,@NCPspeaks, सहयोगी पक्ष व कार्यकर्त्यांनी मला संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.आपल्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.यातूनच मला महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विविध मुद्दे संसदेत मांडण्यासाठी ऊर्जा मिळते. यापुढेही संसदेच्या माध्यमातून मतदारसंघातील व राज्यातील जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन याची ग्वाही देते. धन्यवाद.'' असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

यादीनुसार सुप्रिया सुळे यांची 17 व्या लोकसभेतील कामगिरी

एकूण उपस्थिती: 92%

एकूण चर्चासत्र: 159

एकूण प्रश्न: 383

खाजगी विधेयक: 7

संसदीय नोंदीनुसार हिवाळी अधिवेशनात चर्चा आणि जनतेचे मुद्दे मांडणे या आघाडीवर सुप्रिया सुळे सर्वात अग्रेसर होत्या. अधिवेशन काळात सुप्रिया सुळेंनी 21 मुद्दे मांडत चर्चेतही सहभाग घेतला. तर डॉ शिंदे यांनी 12, शेवाळे यांनी 9, बारणे यांनी 8 विषयांवर मतप्रदर्शन केले. राज्यसभेत डॉ खान यांनी 46 तर चव्हाण यांनी 11 जनहिताचे मुद्दे मांडले किंवा गोंधळामुळे ते सभापटलावर सादर केले. त्याचबरोबर, अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थिती “नोंदविणारे” सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ खान, महात्मे, चव्हाण आणि प्रकाश जावडेकर हे मोजकेच मराठी खासदार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com