Supriya Sule : 'ईडी सरकार आल्यापासून ५० खोक्यांचीच चर्चा!'

Supriya Sule : मंत्रीच ५० खोक्यांचे ऑफर देत असतील, तर त्यामध्ये काही तरी सत्य असेलच.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

पुणे : जेव्हापासून ईडी सरकार आले, पन्नास खोक्यांचीच चर्चा होत आहे. ईडी सरकारमधील मंत्र्यांनीही म्हटले की, पन्नास खोके हवे आहेत का? जर सरकारधील मंत्रीच समोरून अशी ऑफर देत असतील, तर त्यामध्ये काही तरी सत्य असेलच, असा टोला राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे - फडणवीस सरकारला लगावला.

नागपूर जिल्ह्यातील मिहानमध्ये टाटा समहाचा एअरबस प्रकल्प येणार आहे, असे राज्याचे उद्योगमंत्री म्हणाले होते. एक वर्षाआधीच टाटांचा हा प्रकल्प गुजरातला जाणार, असेही उद्योगमंत्री म्हणाले आहेत, याची आठवण सुप्रिया सुळेंनी करून दिली. मात्र हा प्रकल्प राज्यात आणण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान, केंद्र सरकारची मनधरणीत करण्यात अपयश आले, अशी बातमी वर्तमानपत्रात वाचली, असेही सुळे म्हणाल्या.

Supriya Sule
Tata Airbus : गुजरात निवडणुका जिंकण्यासाठीच प्रकल्प पळवले : रोहित पवारांचा आरोप!

प्रकल्प गुजरातला जाण्याचे कारण काय?

देशाचा विकास होण्याला महत्त्व आहे, परंतु गुणवत्तेच्या आधारावर महाराष्ट्रात जे काही उद्योग आले, त्या फक्त गुजरातेमध्येच नेले जाण्याचं काय कारण असेल? एकीकडे प्रकल्प गुजरातेत गेले आहेत, पण सरकारकडून याचे समर्थनच केले जात आहे. या महाराष्ट्रातील लोकांना कामाची गरज नाही का? असा सवालही सुळे यांनी विचारले.

Supriya Sule
'उद्याेगधंदे गुजरातला जात असतील तर महाराष्ट्रातल्या तरूणांनी हनुमान चालिसा म्हणायची का?'

किती नेते बांधावर गेले?

जर एखादा निर्णय घेतला गेला तर ठिक आहे. मात्र नेहमीच तेच तेच निर्णय पुन्हा पुन्हा होणार असतील तर मनात पाल चुकचुकतेच. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही कोणतीही मदत पोहचलेली नाही. राज्यातील महत्वाचे नेतेच नुकसानग्रस्त भागाची पाहणीसाठी गेले नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in