Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळेंच्या साडीनं घेतला अचानक पेट

Supriya Sule: या घटनेनंतरही सुळे कार्यक्रमासाठी तिथेच थांबल्या होत्या.
supriya sule
supriya suleSarkarnama

Supriya Sule News : हिंजवडी येथे एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, प्रसंगावधानता दाखवत तत्काळ आग विझवण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला.

supriya sule
Satyajeet Tambe News : सत्यजित तांबेंच्या उमेदवारीबाबत राम शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट : ‘फडणवीसांनी तांबेंना अगोदरच सांगितले होते’

खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते हिंजवडीत येथील कराटे कोचिंग क्लासेसचं उद्घाटन करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमात दीप प्रज्वलन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करताना सुळे यांच्या साडीनं अचानक पेट घेतला. ही बाब यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. आणि तत्काळ साडीला लागलेली आग विझवण्यात आली.

यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे काहीवेळ कार्यक्रमात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेनंतरही सुप्रिया सुळे(Supriya Sule) कार्यक्रमासाठी तिथेच थांबल्या होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, थोडं दुर्देव होतं बाकी काही नाही. थोडक्यात वाचले, सगळे आम्ही कराटे प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाला गेलो होतो. यावेळी तिथे मेणबत्ती होती. त्यातूनच माझ्या साडीनं अचानक पेट घेतला. ते आमच्या लगेच लक्षात आलं. त्यानंतर सगळा कार्यक्रम होते. त्यामुळे कपडे बदलायला वेळ मिळाला नाही.

supriya sule
Nepal Plane Crash : नेपाळमधील विमान अपघातात ४५ जणांचा मृत्यू ; ५ भारतीयांचा समावेश

या घटनेनंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या..?

हिंजवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेचं उद्घाटन करत असताना अनवधानाने साडीने पेट घेतला. पण वेळीच ती आग आटोक्यात आणण्यात आली. आमचे हितचिंतक, नागरीक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की, मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये. आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे. आपणा सर्वांचे मनापासून आभार असे आवाहनही खासदार सुळे यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com