'महाराष्ट्राचे अन् मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठीच प्रकल्प गुजरातला हलविला!'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची शिंदे गटावर टीका
Supriya Sule, Eknath Shinde
Supriya Sule, Eknath Shindesarkarnama

पुणे : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार बुडाला. मुंबई व महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठी वाटेल ते केले जात आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी राज्याला गंभीर मुख्यमंत्र्याची गरज आहे. त्यासाठी गरज पडल्यास दोन मुख्यमंत्री नेमा मात्र, मराठी तरुणांचा रोजगार हिसकावून घेऊ नका, अशी खरमरीत टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे सरकारवर केली.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने बुधवारी स. प. महाविद्यालयाजवळ जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात खासदार सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे (NCP) पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.

Supriya Sule, Eknath Shinde
Shivsena : शिंदेच्या हातून धनुष्यबाण पुन्हा निसटला, विद्यमान पदाधिकारी ‘जैसे थे’

या वेळी खासदार सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राची संस्कृती दिल्लीपुढे न झुकण्याची राहिली आहे. मात्र, सध्याच्या ईडी सरकारचे सर्व निर्णय दिल्लीत होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नवीच संस्कृती उदयास येत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत तातडीने पंतप्रधानांची भेट घेऊन हा प्रकल्प महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले, 'या प्रकल्पामुळे राज्यात १ लाख ५८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. एक लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले असते. महाविकास आघाडी सरकारने सर्व प्रक्रिया पूर्ण करून हा प्रकल्प राज्यात आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे काम केले. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर ईडी सरकारने तरुणांच्या हक्काचा घास हिरावून घेतला आहे. आंदोलनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ढोल, ताशे व नगारे वाजवून विरोध दर्शविला.

Supriya Sule, Eknath Shinde
‘वेदांत-फॉक्सकाँन’ प्रकल्प : नेमकं खरं अन् खोटं कोण बोलतयं; फॅक्ट चेक !

पुढील काळात राज्यातील मोठे उद्योग व रोजगार परराज्यात गेल्यास आम्हाला फक्त दहीहंडी व इतर समारंभामध्ये ढोल वाजवण्याचेच काम शिल्लक राहील, अशी उदिग्न प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात मृणालिनी वाणी, अश्विनी कदम, दीपक जगताप, विक्रम जाधव, विशाल तांबे, संतोष नांगरे, नाना नलावडे, काका चव्हाण, वैष्णवी सातव, रत्ना नाईक, अश्विनी भागवत, मनीषा होले, रोहन पायगुडे, फईम शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in