Dilip Walse-Patil On Bailgada Sharyat: सर्वोच्च न्यायालयाची बैलगाडा शर्यतींना परवानगी; दिलीप वळसे पाटील म्हणाले....

Dilip Walse Patil News: सर्वोच्च न्यायालयानं अखेर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींसाठी हिरवा कंदिल देत बैलगाडा शर्यतींना परवानही दिली आहे.
Dilip Walse-Patil on Bullock Cart Race:
Dilip Walse-Patil on Bullock Cart Race: Sarkarnama

Supreme Court's Permission for Bullock Cart Race: सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे राज्यातील सर्व शेतकरी आणि बैलगाडा संघटनांचा आनंदाचा दिवस आहे. गेल्या बारा वर्षांपासून सुरु असलेल्या लढाईचा हा विजय आहे. अशी प्रतिक्रीया माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली आहे.

बारा वर्षांच्या संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयानं अखेर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींसाठी हिरवा कंदिल देत बैलगाडा शर्यतींना (Bullock cart race) परवानही दिली आहे. न्यायालयातील सर्व कायदेशीर अडथळे दूर झाले असून राज्यातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय तामिळनाडूतील जलिकट्टू खेळालाही परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Dilip Walse-Patil on Bullock Cart Race:
SC Decision On Bailgada Sharyat: मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय ; बैलगाडा शर्यतींना परवानगी

काय म्हणाले दिलीप वळसे-पाटील?

राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आणि गाडा शौकिनांसाठी ही सर्वांत आनंदाची बातमी आहे. गेल्या काही वर्षे सत्त काहीना काही कारणामुळे या बैलगाडा शर्यती (Bullock cart Race latest news) सुरु करण्यात अडचणी येत होत्या. बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी पुर्वीच्या सरकारने आणि आताच्याही सरकारने न्यायालयीन प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केला होता. अनेक शेतकरी संघटनाही या निर्णयासाठी कार्यरत होत्या. अनेकदा मी स्वत: देखील न्यायालयातील येणाऱ्या कायदेशीर अडचणी दुर कऱण्यासाठी वकिलांकडे गेलो. पण आजचा निर्णय हा सर्व शेतकरी आणि बैलगाडा संघटनांसाठी आनंदाचा क्षण आहे.

Dilip Walse-Patil on Bullock Cart Race:
SC Decision On Bailgada Sharyat: बैलगाडा शर्यतीला परवानगी, पण सुरक्षेचं काय ? ; आढळरावांनी दिला सरकारला 'हा' सल्ला..

दरम्यान, तामिळनाडू आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या संबंधित कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. सुनावणीनंतर घटनापीठानं याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. अखेर तामिळनाडूमधील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आज(दि.१८) एकत्रितपणे निकाल निकालाचं वाचन केलं. राज्यातील बैलगाडा शर्यतीचं भवितव्य आज ठरणार असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडं बैलगाडाप्रेमींचं लक्ष लागलेलं होतं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in