PMC News : पुण्यातील मोठ्या प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

Murlidhar Mohol : प्रकल्प दर्जेदार आणि वेळत पूर्ण करण्याचा मोहळ यांचा संकल्प
PMC
PMCSarkarnama

Pune News : पुणे शहरासाठी महत्वाचा असणारा मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प मनपाकडून हाती घेण्यात आला होता. हा प्रकल्प २०१८ मध्ये तयार करण्यात आला होता. प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील मुळा, मुठा आणि मुळा-मुठा या ४४ किलोमीटर अंतराच्या या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन हजार ६१९ कोटी रुपये अंदाजपत्रक तयार केले होते. दरम्यान, या प्रकल्पाविरोधात पर्यावरणप्रेमींनी काही आक्षेप घेत राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) धाव घेतली.

PMC
Khaire : शिंदे यांनी यापुर्वीच गद्दारीचा प्रयत्न केला होता, तेच काॅंग्रेससोबत जाण्यास आतूर होते..

मुळा-मुठा सुधार हा शहरासाठी महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले होते. पर्यावरणप्रेमींच्या आक्षेपामुळे सात हजार कोटींचा नदी सुधार प्रकल्प थांबला. प्रकल्प राबविण्यासाठी पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला होता. तसेच या प्रकल्पात सहा हजार झाडे तोडली जाणार असल्याचा आरोपही करण्यात येत होता. त्यानुसार पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT) याचिका दाखल केली होती.

PMC
Shivsena News : शिवसेना कर्नाटकात ११० जागा लढविणार

दरम्यान, पर्यावरणप्रमींची याचिका राष्ट्रीय हरित लवादाने नोव्हेंबर २०२२मध्ये फेटाळलेली आहे. त्यानंतर पर्यावरणप्रेमींनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे मोहळ यांनी नमूद केले आहे. हा प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्यची ग्वाहीही मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohal) यांनी यावेळी दिली आहे.

मोहोळ यांनी ट्वीटमध्ये नमूद केले की, "नदीकाठ सुधार प्रकल्पाविरोधातील याचिका ‘एनजीटी’पाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळल्याने या प्रकल्पाला आता निश्चितच गती येईल.पर्यावरणाच्या अनुषंघाने सर्वांगीण विचार करुनच आपण हा प्रकल्प अंतिम केला होता. त्यावर आता न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याने निश्चितच समाधान आहे. हा प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार करण्याचाच निश्चित प्रयत्न असेल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com