भीमा कोरेगाव हिंसाचार : तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंची होणार चौकशी

Bhima Koregaon Violence| Crime news pune | भीमा कोरेगाव हिंसाचार हिंसाचार झाला तेव्हा तेजस्वी सातपुते या पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होत्या.
Bhima Koregaon Violence
Bhima Koregaon Violence

पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचार (Bhima Koregaon Violence) प्रकरणी तत्कालीन पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते (IPS Tejaswi Satpuet) यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे,अशी माहिती चौकशी आयोगाचे सचिव व्ही. पाळनिटकर यांनी दिली. येत्या 21 ते 25 मार्च दरम्यान ही सुनावणी पुण्यात घेतली जाणार आहे. ((Bhima Koregaon Violence news update)

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सातपुते यांच्यासोबतच वढू बुद्रुक आणि कोरेगाव भीमा येथील स्थानिक नागरिक संभाजी शिवले, बाळासाहेब जमादार आणि रमेश गलांडे यांची साक्ष नोंदवणार आहे. पुण्यातील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीत 21 ते 25 मार्च दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान चौकशी आयोगाची सुनावणी होणार आहे.

Bhima Koregaon Violence
गुंड एजाज लकडावाला विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल

कोरेगाव भीमा येथे 01 जानेवारी 2018 रोजी घडलेल्या हिंसाचाराची घटना घडली. त्यावेळी तेजस्वी सातपुते या पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होत्या. त्यामुळे कायदा, सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्याची साक्ष नोंदवण्यात येणार असल्याची माहिती चौकशी आयोगाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या महिन्यात कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil)यांचीही चौकशी करण्यात आली. कोरेगाव भीमा हिंसाचार घटनेच्या वेळी विश्वास नांगरे पाटील हे तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्‍हणून कार्यरत होते. तर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या आयोगाच्या समोर माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची तब्बल सहा तास चौकशी झाली. विश्वास नांगरे पाटील यांच्यासह या हिंसाचार प्रकरणी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग, रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आली होती,

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com