अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त सुनील शेळकेंचा दहा लाखांचा उपक्रम

Sunil shelke| NCP| राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या येत्या वाढदिवसापर्यंत (१२ डिसेंबर) म्हणजे पाच महिने ही स्पर्धा चालणार आहे.
Ajit Pawar| Sunil Shelke| NCP|
Ajit Pawar| Sunil Shelke| NCP|

पिंपरी : ग्रामंपचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या मावळ तालुक्यांतील गावांना मावळचे (जि.पुणे) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार सुनील शेळके यांनी २१ लाख रुपयांचे बक्षीस नुसते जाहीर केले नाही, तर नंतर अशी निवडणूक केलेल्या गावांना त्यांनी तीन कोटी रुपयांचे हे पारितोषिक दिलेही. त्यानंतर शुक्रवारी (ता.२२) त्यांनी पक्षाचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त "माझं गाव, माझा स्वाभिमान"ही प्रत्येक गावाला दहा लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्याची स्पर्धा जाहीर केली.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या येत्या वाढदिवसापर्यंत (१२ डिसेंबर) म्हणजे पाच महिने ही स्पर्धा चालणार आहे. १२ डिसेंबरलाच या स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल,असे आ. शेळके यांनी सांगितले. 'माझं गाव,माझा स्वाभिमान' ही स्पर्धा विकासासाठीची आहे.त्यात मावळ तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने सहभागी व्हावे. विविध 10 विभागांसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या इच्छाशक्तीतून, सहभागातून गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा ध्यास असलेल्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी हे बक्षीस मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडुन दिले जाणार आहे.या स्पर्धेमुळे गावातील समस्या व प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होणार आहे. या विकासाच्या स्पर्धेसाठी अनेक ग्रामपंचायती नक्कीच हिरीरीने सहभागी होतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Ajit Pawar| Sunil Shelke| NCP|
बाबो...! मंत्र्याच्या सहकाऱ्याच्या घरात वीस कोटींच घबाड: पैशाचा अक्षरश: ढिगाराच

मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे, माजी पंचायत समिती सभापती दिपक हुलावळे, युवक अध्यक्ष किशोर सातकर, संदीप आंद्रे यावेळी उपस्थित होते. मावळ राष्ट्रवादीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. शंभर टक्के करवसुली, तंटामुक्त गाव, आयएसओ मानांकन व डिजिटल शाळा, स्वच्छ पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन,खड्डेमुक्त रस्ते, कर थकित न ठेवणे, महिला सक्षमीकरण आणि हागणदारीमुक्त करणाऱ्या ग्रामपंचायतींना १० लाख रुपयांचे रोख बक्षिस व त्याव्यतिरिक्त या दहा निकषांमध्ये पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतीना दहा लाख रुपयांचा आमदार निधीही देण्यात येणार आहे.प्रत्येक निकषासाठी १ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार असल्याने १० पेक्षा कमी निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना देखील लाभ मिळणार आहे. या स्पर्धेमुळे गावातील समस्या व प्रश्न सुटण्यास मदत होईल,असा दावा आ. शेळकेंनी केला आहे.ही स्पर्धा विकासासाठी असल्याने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने तीत सहभागी व्हावे,असे आवाहन त्यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in