खेड्यातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सुनील केदारांनी दिला कानमंत्र

Sunil Kedar latest news| या योजनेमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल व ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत होईल
Sunil Kedar
Sunil KedarFacebook/@SunilKedar

Sunil Kedar on village Economy :

पुणे : राज्यातील ग्रामीण भागात शेळया-मेंढ्या असलेल्या लोकांकडे उत्पन्नाचा चांगला स्त्रोत आहे. त्यासाठी शेळीचे वजन वाढवणे आणि अधिक दूध देणारी शेळीची प्रजाती विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार कार्यक्रमात पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार (Sunil Kedar) बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था (Economy) बळकट करण्याचे सर्वोत्तम पर्याय सांगितले.

यावेळी आमदार दिलीप मोहिते, अतिरिक्त आयुक्त धनंजय परकाळे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह उपस्थित होते. यावेळी पशुसंवर्धन विभागातील 82 अधिकाऱ्यांना गुणवंत पशुवैद्यक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'राज्यातील शेतकरी, शेजमजुराला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेळी-मेंढीपालन हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे वक्तव्य पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केले.

Sunil Kedar
शरद पवार ब्राम्हण संघटनांची बैठक घेणार: देवेंद्र फडणवीस म्हणाले...

सध्या आपल्याकडे देशी शेळीचे वजन 20 ते 25 किलो आहे. त्यांचे वजन किमान 60 किलोपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय शेळीची दूध देण्याची क्षमता वाढवण्याचाही प्रयत्न आपण करत आहोत. यात यश आले तर ग्रामीण अर्थव्यवस्थेत नक्कीच सुधारणा होईल, असा विश्वास सुनील केदार यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या शेळी समूह योजनेंतर्गत शेळी समूह योजनेद्वारे राज्यातील शेळी व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येक महसुली विभागाला ४८.८६कोटीच्या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पशु पालक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल व ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोरोना संसर्ग काळातही आर्थिक अडचणी असतानाही कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने चांगले काम केले. पशुसंवर्धन विभागात संशोधन व विकासासाठी अनेक संधी आहेत. शेतकरी, कष्टकऱ्यांनी कुटुंबातील अधिकाऱ्यांनी आपल्या गावातील पशुपालक शेतकऱ्यांना आणि पशुसंवर्धन विभागाला नवीन दिशा कशी देता येईल यासाठी प्रयत्न करावा. त्याला राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Sunil Kedar
पंधरा दिवसापूर्वी शिवसेनेत गेलेले मनसेचे पंजाबी पुन्हा स्वगृही परतणार

विशेष बाब म्हणजे, मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेअंतर्गत ग्रामीण भागात फिरते पशुचिकित्सा केंद्रे सुरु केली आहेत. या माध्यमातून कोरोना काळातही पशु पालकांना चांगली सेवा दिली गेली. पशु संवर्धनासोबतच कुक्कुटपालन व्यवसायाने उभारी घेतल्याचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. प्रयोगशाळेची गरज लक्षात घेत कोरोना काळातही राज्य सरकारने तत्परतेने त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. पशुसंवर्धन विभागाने 'सुंदर माझे कार्यालय' ही मोहीम हाती घेतली असून या मोहिमेतून कार्यालयाचे सुशोभीकरण केले जाणार असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com