कोरोनामुळे शोकग्रस्त कुटुंबे आमदारांनी शोधली...पत्नीने घरोघरी पोचवला दिवाळी फराळ...!

कोरोनामुळे घरातील व्यक्ती गमावलेली एकुण १७०० कुटुंबे शिरूर-हवेलीचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी मतदार संघात शोधली आहेत.
कोरोनामुळे शोकग्रस्त कुटुंबे आमदारांनी शोधली...पत्नीने घरोघरी पोचवला दिवाळी फराळ...!
Sujata PawarSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : कोरोनामुळे किती कुटुंबातील किती जणांचा मृत्यू झाला, याची शासकीय माहिती अद्याप कुठेच उपलब्ध नाही. पण, शिरूर-हवेलीचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार या कामाला लागले असून कोरोनामुळे घरातील व्यक्ती गमावलेली एकुण १७०० कुटुंबे त्यांनी मतदार संघात शोधली आहेत. सरकारी पातळीवरून त्यांच्यासाठी काय मदत करता येईल, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. पण, तीच यादी घेऊन त्यांच्या पत्नी सुजाता पवार यांनी या प्रत्येक कुटुंबापर्यंत दिवाळीचा फराळ पोचविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. दुःखितांच्या घरातील व्यक्तींना दिवाळीचा फराळ मिळावी, यासाठी त्यांची ही धडपड सुरू आहे. (Sujata Pawar, wife of MLA Ashok Pawar, delivered Diwali Faral to the homes of families affected by corona)

कोरोनाने ज्या-ज्या कुटुंबांना आप्तजनांच्या मृत्यूने दु:खाच्या दरीत लोटले, त्या प्रत्येकाच्या घरात या वर्षीची दिवाळी होण्याची शक्यता कमी आहे. या प्रत्येक कुटुंबासाठी सरकारी पातळीवरून आर्थिक मदत मिळावी, यासाठी आमदार पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कोरोनामुळे ज्यांच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्यांची गणती त्यांनी सुरू केली आहे. शिरुर-हवेली मतदारसंघात अशी १७०० कुटुंबांची यादी आत्तापर्यंत त्यांच्याकडे तयार झाली आहे. ह्याच यादीतील कुटुंबांंना दिवाळीचा फराळ पोचविण्यास सुजाता पवार यांनी सुरुवात केली आहे.

Sujata Pawar
भाजपला धक्का : शिवसेनेला मदत करणाऱ्या बंडखोरांचे नगरसेवकपद अबाधित

ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्या घरात यंदा दिवाळी साजरी होण्याची शक्यता कमीच आहे. हाच संवेदनशील धागा पकडत आमदार अशोक पवार यांनी मतदार संघातील प्रत्येक गावांत पाहणी करून १७०० कुटुंबे शोधून काढली आहेत. त्या प्रत्येक घरात, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांपर्यंत दिवाळीचा फराळ पोचविण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. ही संपूर्ण जबाबदारी त्यांच्या अर्धांगिनी सुजाता पवार यांनी घेतली आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्या संपूर्ण शिरुर तालुक्यातील ९३ गावांसह हवेलीतील ३९ गावांत फिरत आहेत. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या घरी दोन स्टील डब्यांमध्ये लाडू, चिवडा व तत्सम फराळ त्या समक्ष देऊन त्यांचे दु:ख हलके करण्याचाही प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत सुमारे ९० टक्के कुटुंबापर्यंत फराळाचे वाटप झाले असून येत्या दोन दिवसांत उर्वरित कुटुंबापर्यंतही दिवाळी फराळ पोचेल, असे सुजाता पवार यांनी सांगितले.

Sujata Pawar
आमच्या बंधूराजची गाडी आज लयंच जोरात होती : बारामतीत अजितदादांची फटकेबाजी!

उपक्रमाचे श्रेय दिले एकमेकांना!

या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी सुजाता पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, ही कल्पना आमदार अशोक पवार यांचीच. मी फक्त ती राबवतेय. आमदार पवार म्हणाले की, सामाजिक उत्तरदायित्वाची खरी जाण आमच्या सौभाग्यवतींना आहे. त्यांनीच ही कल्पना मांडली आणि त्याच त्याची अंमलबजावणी करीत आहेत. दोघांचीही एकमेकांना श्रेय देण्याची ही पद्धत मात्र अनेक जोडप्यांसाठी पथदर्शी आहे, तशीच ती १७०० कुटुंबांना दिलासा देणारी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in