असे आहे, आमश्‍या पाडवींच्या आमदारकीचे शिवनेरी कनेक्शन !

पाडवी हे गेली अनेक वर्षे पक्ष संघटनेत कार्यरत आहेत.
Amasha Padavi
Amasha PadaviSarkarnama

पुणे विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडुन पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि नंदुरबारचे जिल्हाप्रमुख आमश्‍या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. या दोघांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अहिर यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात होती. तशी ती मिळाली. मात्र, आमश्‍या पाडवी यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याने त्यांचे नाव चर्चेत आले. पाडवी यांच्या उमेदवारीचे कनेक्श्‍न पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील शिरोली गावाशी जोडले आहे.

Amasha Padavi
शिवसेना नेते हितेंद्र ठाकूरांना ४ दिवसात २ वेळा भेटले; अखेर ठाकरेंनी पवारास्त्र वापरले!

शिरोली (ता.जुन्नर) येथील कडवट शिवसैनिक बबन थोरात हे गेली अनेक वर्षे पक्ष संघटनेत कार्यरत आहेत. संघटनानत्मक विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. गेली अनेक वर्षे ते धुळे-नंदुरबारचे संपर्कप्रमुख म्हणून काम करत आहेत. संपर्कप्रमुख म्हणून काम करत असताना त्यांनी तळागाळापर्यंत पक्ष संघटन वाढविले आहे. आमश्‍या पाडवी हे नंदुरबारचे जिल्हाप्रमुख म्हणुन काम करत असताना, मातोश्रीच्या आदेशाची अंमलबजावणी थोरात आणि पाडवी यांनी केली आहे. नुकताच झालेल्या शिवसंपर्क अभियान देखील थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात आले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

पाडवी हे गेली अनेक वर्षे पक्ष संघटनेत कार्यरत असून, गेल्या विधानसभेला अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी मंत्री के. सी. पाडवी यांच्या विरोधात लढताना तब्बल ८० हजारांपेक्षा अधिक मते मिळवली होती. यामध्ये थोरात यांचा मोठा वाटा होता. पाडवी यांच्या एकनिष्ठतेचे बक्षिस बबन थोरात यांच्या माध्यमातुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाडवी यांना दिल्याचे बोलले जात होते. आज उमेदवारी अर्ज दाखल करताना, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या सोबत बबन थोरात देखील उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com