Shikrapur Crime| पोलिसांना गुंगारा देणारा महेश जगताप जेरबंद

Shikrapur Crime| महेश जगताप याने एका परप्रांतियाकडे खंडणी मागत त्याला जबर मारहाण केली होती.
Shikrapur Crime|
Shikrapur Crime|

शिक्रापूर : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अशोक पवारांसह भाजपाचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांची नावे सांगून गेले पाच महिने पोलिसांनाच गुंगारा देणारा खंडणी गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेश जगताप (पिंपळे-जगताप, ता.शिरूर) याला शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केला. त्याने सणसवाडीतील भारत गॅस कंपनीतील एका परप्रांतिय ठेकेदारास मारहाण करुन दोन लाखांची खंडणी उकळली होती व दर महिन्याला पन्नास हजारांची खंडणी देण्यासाठी त्याचा तगादाही सुरू होता.

याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले की, पाच महिन्यांपूर्वी भारत गॅस कंपनीत संध्याकाळी आठच्या सुमारास फुलसिंग रेवती यादव (रा.चाकण, मुळ रा.राजस्थान) हा लेबर कॉन्ट्रॅक्टरशी नियमित मिटींग करुन कंपनीतून बाहेर पडला असता त्याला थेट उचलून आपल्या गाडीत बसवून जवळच्या तळ्याजवळ नेले होते. तिथे त्याला महेश जगताप आणि त्याच्या एका साथीदाराने जबर मारहाण केली होती. मारहाण करतानाच आरोपीने फिर्यादीकडे तब्बल साडेतीन लाखांची खंडणी तात्काळ देण्याची मागणी करीत जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.

Shikrapur Crime|
मविआ सरकारमधील मंजूर पगाराची थकबाकी द्या, एसटी कामगारांचा आंदोलनाचा इशारा!

यावेळी फिर्यादी यादव याने त्याचे मित्र व नातेवाईकांकडून दोन लाखांची तजवीज गुगलपेवर केल्याने व उर्वरीत दिड लाख नंतर देण्याच्या हवाल्याने त्याला सोडून देण्यात आले होते. याशिवाय फिर्यादी यादव याला कंपनीतील कंत्राट सुरू ठेवायचे असल्यास दर महिन्याला पन्नास हजार देण्याचा तगादाही जगताप याचा सतत सुरू होता. याबाबतची रितसर तक्रार ४ मे २०२२ रोजी तक्रार दाखल झाल्यापासून आरोपी महेश जगताप हा पोलिसांना सतत गुंगारा देत होता.

परिसरात तो तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अशोक पवारांसह भाजपाचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांची नावे व त्यांच्याशी जवळीक असल्याचे सांगत असल्यानेच आपल्याला अटक होत नसल्याचे तो बिनधास्त सांगत होता. सदर बाब पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना समजताच त्यांनी जगतापसाठी स्वतंत्र पथक नेमले व त्याला आज पिंपळे-जगताप येथील एका पेट्रोल पंपावरुन ताब्यात घेत अटक केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in