सुभाष देसाई म्हणाले; हिंजवडी मेट्रो १५ महिन्यांत पूर्ण कराच!

हिंजवडी आयटी पार्कला जोडणाऱ्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो टप्प्याचे काम संथगतीनेसुरू आहे
desai.jpg
desai.jpg

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कला जोडणाऱ्या मेट्रो, रिंगरोड तसेच रस्त्याची कामे जलद गतीने पूर्ण होतील. येत्या १५ महिन्यात हे काम पूर्ण झाले पाहिजे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई (subhash desai) यांनी आज मुंबईतील आढावा बैठकीत स्पष्ट केले.(Subhash Desai said; Hinjewadi Metro to be completed in 15 months)

 हिंजेवाडी आयटी पार्कला जोडणाऱ्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो टप्प्याचे काम संथगतीने होत असल्यामुळे आयटी पार्ककडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.त्यावर मार्ग काढण्याची विनंती आयटी उद्योग असोसिएशनने केली.त्या अनुषंगाने आज उद्योगमंत्री देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक घेण्यात आली.  

 यावेळी उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग, नगरविकास विभागाचे सचिव भूषण गगराणी, एमआय़डीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन, पुणेमहानगर प्रदेश विकास प्राधिकारणचे सुहास दिवसे, सिटी मेट्रो रेलचे सीईओ अलोक कपुर, हिंजवडी आयटी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पै, उपाध्यक्ष सतीश मालविया आदी उपस्थित होते.

 यामार्गावर एकूण २३ किलोमीटर अंतराचा मेट्रो प्रकल्प आहे. मागील सहा महिन्यांपासून मेट्रोची कामे प्रगतीपथावर असून पुढील १५ महिन्यांत ती पूर्ण होतील, असा विश्वास पुणे आयटी सिटी मेट्रो रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलोक कपूर यांनी व्यक्त केला.

मेट्रोची कामे पूर्ण होईपर्यंत पुढील पंधरा महिने पर्यायी रस्ते वापरावे लागतील, त्यातील त्यातील अडथळे दूर करावेत, याशिवाय रिंग रोड आणि बाणेर रस्त्याची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देसाई यांनी केल्या.हिंजवडी आयटी क्षेत्राला जोडणाऱ्या मार्गांचा मार्गातील मेट्रो कामांचा पुढील तीन महिन्यांत पुन्हा आढावा घेतला जाईल, असे उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग यांनी स्पष्ट केले.
Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com