एमपीएससी आणि पोलिसांच्या दबावानंतर विद्यार्थ्यांची माघार; राष्ट्रवादी उतरली मैदानात

MPSC| महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकताच अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल केला.
MPSC
MPSC

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) नुकताच अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल केला. त्यामुळे यापुढे आता एमपीएससीच्या परीक्षाही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा होणार आहेत. मात्र नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीतील बदलाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, तर तो एमपीएससीवरील दबाव समजून कारवाई करण्यात येईल, असा इशारा एमपीएससीकडून आंदोलक विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.

एमपीएससीच्या निर्णयाविरोधात आज पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर एमपीएससीने घेतलेला हा निर्णय २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. ही मागणी मान्य न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला होता. मात्र, एमपीएसीच्या इशाऱ्यानंतर अखेर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

MPSC
फडणवीस भेट आणि भाजप प्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदेंनी स्पष्टच सांगितले...

यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या विद्यार्थ्यांच्या मागणीला पांठिंबा देत विद्यार्थ्यांचे म्हणणे मांडले आहे. 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम पुढील वर्षापासून लागू करून सध्याची परीक्षा जुन्या अभ्यासक्रमाप्रमानेच व्हावी,या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. अचानक लागू केलेल्या या फतव्या मुळे अनेक विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

तसेच या निर्णया विरोधात कोणत्याही विध्यार्थ्यांने आंदोलन करू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. ही बाब लोकशाहीला काळिमा फासणारी व विध्यार्थ्यांचे मूलभूत अधिकार विरोधी आहे. आयोगाच्या व शासनाच्या या दडपशाही विरोधात लालबहादूर शास्त्री रस्त्यावर प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रदीप देशमुख म्हणाले की, आयोगाचा नवीन अभ्यासक्रमाचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु विद्यार्थ्यांनाही नवीन अभासक्रमानुसार परीक्षेच्या तयारी करण्यासाठी वेळ देणे ही गरजेचे आहे. सध्या होणाऱ्या परीक्षा ह्या आता असणाऱ्या अभ्यासक्रमानुसार व्हाव्यात. राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन महीना होत आला. तरीही महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या समस्या मांडण्यासाठी मंत्री मंडळ स्थापन करण्यासाठी वेळ लागत आहे. विध्यार्थ्यांनाही नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे परीक्षा देण्यासाठी आयोगाने कालावधी देणे आवश्यक आहे.

MPSC
नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात...; निलेश राणेंनी शिवसनेला डिवचले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकशाहीला दिलेल्या संविधानात लोकशाही मार्गाने सरकाच्या अमान्य धोरणा विरोधात आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. परंतु हे हिटलरवादी राज्यसरकार विध्यार्थ्यांना आंदोलन करण्यापासून रोखत आहे. हा लोकशाहीचा अपमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापी खपवून घेणार नाही. विध्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच विध्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरून लढण्यासाठी तयार आहे. आणि विध्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत राहील, असंही प्रदीप देशमुख यांनी सांगितलं. यावेळी उपस्थित आंदोलक विद्यार्थ्यांनी MPSC चा धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो, हौश मे आओ हौश में आओ राज्यसरकार हौश मे आओ, ह्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com