औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेची रणनीती पुण्यात ठरली!

राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेबाबत तेथील पोलिस आयुक्त येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय घेतील.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमधील (Aurangabad) सभेला पोलिसांकडून अजून परवानगी मिळालेली नाही. मात्र, मनसेकडून त्या सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. पुण्यात (Pune) मनसेच्या कोअर कमिटीची आज (ता. २६ एप्रिल) बैठक झाली. त्या औरंगाबादच्या सभेच्या नियोजवर विस्तृतपणे चर्चा करत सभेची रणनीती ठरविण्यात आली आहे. (Strategy of Aurangabad's Raj Thackeray's Rally's decided in Pune)

राज ठाकरे हे येत्या ता. २९ आणि ता. ३० एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. औरंगाबादच्या सभेला ते पुण्यातून रवाना होणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. या बैठकीत औरंगाबाद सभेच्या नियोजनावर चर्चा झाली. पण, पोलिस प्रशासनाकडून ठाकरे यांच्या सभेला अद्याप परवानी देण्यात आलेली नाही. उलट येत्या ९ मेपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे, त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेबाबत अनिश्चितता आहे. याच मुद्यावरून मनसेचे प्रकाश महाजन यांनी पोलिसांवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या औरंगाबादमधील कार्यक्रमाला कशी परवानगी देण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Raj Thackeray
औरंगाबादमध्ये जमावबंदी; राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता धूसर

पुण्यातील मनसेच्या बैठकीत राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. तो दौरा कसा असणार, त्यांच्यासोबत कोण कोण जाणार, यासंदर्भातही चर्चा झाली. येत्या ता. ३ मे रोजी पुण्यात होणाऱ्या महाआरतीसंदर्भात देखील नियोजन झालेले आहे. महाआरतीसाठी परवानगी मिळावी म्हणून शहरातील पोलिस ठाण्यात पत्र देण्याचे काम सुरू आहे, असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. मनसे शहर कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

Raj Thackeray
मी धर्मांध नाही, मी धर्म अभिमानी आहे; राज ठाकरेंच्या सभेचा वादळी टिझर रिलीज

ठाकरेंच्या सभेबाबत आयुक्त दोन-तीन दिवसांत निर्णय घेतील : गृहमंत्री

दरम्यान, राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेबाबत तेथील पोलिस आयुक्त येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय घेतील. ते सहकारी आणि पोलिस महासंचालक यांच्याशी चर्चा करत आहेत. तेथील परिस्थितीनुसार औरंगाबादचे पोलिस आयुक्त निर्णय घेतील, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in