'शिंदे-फडणवीस हे सरकार पाडण्यात एक्सपर्ट!'

Shinde- Fadnavis News : 'शिंदे -फडणवीस सरकार जाणार ही फक्त अफवा...'
Eknath Shinde Devandra Fadnavis Latest News
Eknath Shinde Devandra Fadnavis Latest NewsSarkarnama

Shinde- Fadnavis News : पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक्सपर्ट असल्याने त्यांचे सरकार जाणार ही फक्त अफवा आहे. ते १५-२० वर्षे राहणार आहेत. शिंदे-फडणवीस हे सरकार पाडण्यातही एक्सपर्ट आहेत, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले. ते मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते.

''नाराजीमुळे हे सरकार जाणार अशी अफवा पसरवली जात आहे, पण हे सरकार जायचे असते तर ते आलेच नसते'', असे आपल्या खास अंदाजात आठवले यांनी यावेळी सांगितले. शिंदे-फडणवीस (Fadnavis) सरकारमध्ये मंत्रीपदावरून नाराजी नाही हे सांगताना त्याचवेळी मंत्रिमंडळाला मर्यादा असल्याने सर्वांना त्यामध्ये स्थान देता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

''हे नवीन सरकार जाणार नसल्याने त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे अफवेवर विश्वास ठेवू नका'', असे आवाहन त्यांनी केले. अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन होण्यापूर्वीच त्यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या काव्यमय अंदाजात शुभेच्छा दिल्या.

Eknath Shinde Devandra Fadnavis Latest News
अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर आहेत का? अजितदादा म्हणाले की, 'मध्यंतरी माझं त्यांचं बोलणं झालंय...'

''ठराविक पत्रकारांनाच मिळणारी पेन्शन सर्वच पत्रकारांना मिळावी, तसेच त्यासाठीच्या अटीही शिथिल व्हाव्यात, अशी अपेक्षा आठवले यांनी यावेळी व्यक्त केली. कोरोनात मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. जातीभेद संपवणारा कायदा होऊनही दलितांवर अत्याचार होत आहेत. तसेच पत्रकार संरक्षण कायदा करूनही त्यांच्यावर हल्ले होत आहेत, याकडे लक्ष वेधत कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज'' त्यांनी प्रतिपादित केली.

''कायदा करून उपयोग नाही, तर पत्रकारांना सरकारने संरक्षण दिले पाहिजे. कारण त्यांच्यामुळे मी दिल्लीत पोचलो आहे'', अशी कबुली त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे त्यांच्या समस्या व अडचणी या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कानावर घालणार आहे, असे त्यांनी सांगितले. आपणही पत्रकार झालो असतो, असे ते म्हणाले. दलित पॅंथर चळवळीच्या वेळी मी लिहून देत असलेल्या सर्व बातम्या जशाच्या तशा छापल्या जात होत्या, अशी आठवण त्यांनी सांगितली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com