राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार : जयंत पाटलांचे भाकीत

State Government : राज्यातले सरकार सत्तेत येऊन जवळपास तीन महिने पूर्ण होत आले आहेत.
 Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

पुणे : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी उद्या (ता.२७) सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार आहे. या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह सोळा आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील सरकार कोसळणार असून त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल, असे भाकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज केले.

 Jayant Patil
सोलापुरातून आणखी एक महिला सरपंच गायब; पण पोलिसांच्या सतर्कतेने ४८ तासांत सापडल्या

राज्यातले सरकार सत्तेत येऊन जवळपास तीन महिने पूर्ण होत आले आहेत. या सरकारवर पहिल्या दिवसापासून अस्थिरतेची टांगती तलवार कायम आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आधी तीन सदस्यांचे खंडपीठ स्थापन केले होते.आता पाच सदस्यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. याप्रकरणी न्यायालयाने उद्या सुनावणी ठेवली आहे. न्यायालयीन सुनावणीचा संदर्भ देत पाटील यांनी हे सरकार टिकणार नसल्याचे म्हटले आहे.

 Jayant Patil
जितेंद्र आव्हाडांनी फडणवीसांची भेट का घेतली?; चर्चेला उधाण...

उद्या होणाऱ्या सुनावणीत सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दयाबरोबरच खरी शिवसेना कोणती यावरदेखील निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. खरी शिवसेना कोणती ? धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले असून यावरच उद्या न्यायालयात निर्णय होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. आमदारांची अपात्रता व पक्षाच्या चिन्हाबाबत सुनावणी प्राधान्याने होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या सोळा आमदारांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचा समावेश आहे. या सोळा आमदारांना न्यायालयाने अपात्र ठरवले तर शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. या परिस्थितीत राज्यातील सरकार कोसळेल. त्यानंतर सरकार स्थापन होणे शक्य नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय उरणार नसल्याचे भाकीत पाटील यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com