Pune News: अवघ्या काही महिन्यांपूर्वी भाजपात आलेल्या नेत्याच्या नवीन घरी बावनकुळेंची भेट; जुन्या, निष्ठावंतांच्या भुवया उंचावल्या

Chandrashekhar Bawankule's visit to Ram Gawde's house : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राम गावडे यांच्या घरी भेट दिली.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

आळंदी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे महाराष्ट्र राज्य विषेश निमंत्रित सदस्य राम गावडे यांच्या आळंदीतील नवीन घरी भेट दिली. गावडे यांच्या नवीन वास्तुला भेट देण्याच्या निमित्ताने बावनकुळेंनी दिलेली भेट हा चर्चेचा विषय आणि जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.

अवघ्या काही महिन्यांत शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या राम गावडेंचा स्थानिक पातळीवर भाजपमध्ये वरचष्मा असल्याचे स्पष्ट होत आहे. (Chandrashekhar Bawankule's visit to Ram Gawde's house)

आळंदीत बावनकुळेंनी गुरुवारी (ता.२५) दिलेली भेट गावडेंसाठी राजकीय वजन वाढवणारी आहे. शेती आणि व्यावसायिक असलेले गावडे उच्चशिक्षित आहेत. वारकरी संप्रदायाशी चांगले संबंध आहेत. शिवसेनेत अनेक वर्षे जिल्हा प्रमुखपदावर काम केले ही त्यांची जमेची बाजू आहे. अनेक आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग होता.

Chandrashekhar Bawankule
Ahmednagar News: खुर्चीवरून मानापमान नाट्य; फडणवीसांची राम शिंदेंना 'खास' ट्रीटमेंट; तर विखे पाटलांना सूचक इशारा

राजकारणात चांगली प्रतिमा असूनही जिल्हा परिषद किंवा विधानसभा निवडणुका लढवण्यात यश किंवा सिद्ध होण्याची संधी साधता आलेली नाही. विधानसभेचे तिकीट मिळत असतानाही त्यांनी ते नाकारले. संघटनात्मक बांधणी करुन राजकीय फायदा घेतला. धूर्त आणि स्वच्छ चारित्र्य असल्याने भाजपनेही जवळ केले. आता बावनकुळे, चंद्रकात पाटील यांच्याशी त्यांनी जवळीक वाढवली आहे. अल्प काळात पक्षात ताकद दाखवायची संधीही या भेटीच्या निमित्ताने साधली आहे.

आगामी काळात लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीसाठी ते फिल्डिंग लावून आहेत. यश अपयश भविष्य काळ ठरवेल. पण, सध्यातरी भाजपत त्यांचे वजन वाढले आहे. त्यातूनच बावनकुळे हे गावडेंच्या घरी दाखल झाले आणि गावडेंची शिरुर लोकसभा मतदारसंघात चर्चा सुरु झाली.

Chandrashekhar Bawankule
Kumar Ketkar on Patole: कामाची वेळ पाळा नाहीतर 2024 मध्ये...; कुमार केतकरांनी टोचले नाना पटोलेंचे कान

पक्षातील जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे या स्थानिकांशी जुळवुन घेणे आणि पक्षवाढ केल्यास आगामी काळात मोठी संधी मिळण्याची अपेक्षा गावडेंना आहे. याबाबत आळंदीत भाजपचे काम व्यवस्थित चालू आहे. संघटनात्मक बांधणीही चांगली आहे. लवकरच आळंदीकरांच्या भेटीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना आणणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

दरम्यान, बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. आळंदीच्या विकासाबाबतची माहितीही घेतली. तर लवकरच अमित शाहांनाही आळंदीत आणू असे सांगितले. पण, शाह यांना आळंदीत कशासाठी आणि कधी आणणार?, याचा खुलासा न करता केवळ लवकरच आणू एवढेच बावनकुळे यांनी सांगितले. राम गावडे यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत माहिती दिली. तसेच आणखी विकासकामेही सुचविली.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com