Sate Excise Dpartment News : उत्पादन शुल्क विभागाच्या हाती सापडलं मोठं घबाड

Sate Excise Dpartment News | त्यात चक्क दारूचे कोठारच मिळाले.
Sate Excise Dpartment News
Sate Excise Dpartment News

State Excise Department एक्स्प्रेस वे वर टोल चुकविणारे आणि वाहतुकीचे नियमभंग (वेगमर्यादा न पाळणारे तसेच लेन कटिंग करणारे) करणाऱ्यांवर कारवाई होते. मात्र ऊर्से टोलनाक्यावर आज भलतेच घबाड हाती आले. कंटेनरमधून सहसा यंत्रसामग्रीसारखे अवजड सामान नेले जाते.मात्र,आज त्यात चक्क दारूचे कोठारच मिळाले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तळेगाव कार्यालयाने ही दारूची तस्करी हाणून पाडली. नऊशे बॉक्स त्यांनी पकडले. ४७ लाख ५२ हजार रुपयांची ही चोरीची गोवा बनावटीची दारू आहे.तिची वाहतूक करणारा १५ लाखांचा कंटेनर सुद्धा (एमएच-०१-एन-८००७) जप्त करण्यात आला आहे.

गोवा राज्यात निर्मित व तेथेच विक्रीसाठी परवानगी असलेली दारू ही शेजारील इतर ज्य़ांच्या तुलनेत खूप स्वस्त आहे. म्हणून तिची देशभरच तस्करी केली जाते. परिणामी राज्यांचा महसूल बुडतो. त्यामुळे अशा मद्य तस्करांविरुद्ध सबंधित राज्यांचे उत्पादन शुल्क विभाग कारवाई करीत असतात. त्याबाबत माहिती तळेगावच्या एक्साईज कार्यालयाला मिळाल्याने त्यांनी ऊर्से टोलनाक्यावर शुक्रवारी सकाळपासून सापळा लावला होता.

त्यांना माहिती मिळालेला कंटेनर अडवून त्याची तपासणी केली असता त्यात दारुचे घबाड सापडले.राज्य़ उत्पादन शुल्कचे पुणे विभाग अधिक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे कार्यालयाचे निरीक्षक संजय सराफ, दुय्यम निरीक्षक डी.बी. सुपे तसेच राहूल जौंजाळ, तात्याबा शिंदे, रणजित चव्हाण, हनुमंत राऊत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

चालक गामित सोमवेलभाई सिंगाभाई (वय २५,रा.गुजरात) आणि क्लिनर मोहन दिनराम खथात (वय ३४, रा. राज्यस्थान)यांना राज्य दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.

मात्र,ते छोटे मासे असून एवढ्या मोठ्या दारूची ऑर्डर दिलेल्या गुजरातमधील तस्कराचे नाव समोर आलेले नाही. ते चौकशीत कळेल,असे ही कारवाई केलेल्या पथकातील दुय्यम निरीक्षक डी.बी. सुपे यांनी `सकारनामा`ला सांगितले.

गुजरात राज्यात दारुबंदी असूनही तेथे ती चोरून विकली जात आहे.त्यातही कमी कर असलेल्या गोव्यातून तिची तस्करी तिकडे होत आहे.काल (ता.२७)गुजरातला चाललेला विदेशी दारू भरलेला कंटेनर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ऊर्से टोलनाक्यावर पकडण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com