राज्य बँक यशोशिखरावर; निव्वळ नफा ६०२ कोटींवर

बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर (Vidyadhar Anaskar) व व्यवस्थापकीय संचालक डॉ.अजित देशमुख (Dr. Ajit Deshmukh) यांनी पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली.
vidyadhar anaskar
vidyadhar anaskarsarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला (MSC Bank) गेल्या आर्थिक वर्षात एक हजार ४०२ कोटींचा ढोबळ नफा झाला असून निव्वळ नफा ६०२ कोटी झाला आहे. विशेष म्हणजे बँकेने ‘एनपीए’चे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणले आहे. बँकेची उलाढाल स्थापनेपासून गेल्या १११ वर्षांतील उच्चांकी ४७ हजार २८ कोटींवर पोचली आहे.

vidyadhar anaskar
धुडगुस घालायला अक्कल लागत नाही... अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर (Vidyadhar Anaskar) व व्यवस्थापकीय संचालक डॉ.अजित देशमुख (Dr. Ajit Deshmukh) यांनी पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली. अनास्कर म्हणाले, ‘‘ राज्य बँक दरवर्षी मुख्यमंत्री सहायता निधीला पाच कोटींची रक्कम देते. बॅंकेच्या सभासदांना दरवर्षी १० टक्के लाभांश देण्यात येतो. बॅंकेच्या सहा कर्मचारी संघटनेसोबत करार करण्यात आला असून, कर्मचाऱ्यांना १२ टक्के भरीव वेतनवाढ दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवींवर एक टक्का अधिक व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सामाजिक बांधिलकी जपत कैद्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘जिव्हाळा’ कर्ज योजना सुरू केली आहे.’’

vidyadhar anaskar
फडणवीसांची चतुर खेळी; प्रफुल्ल पटेलांना देणार धोबीपछाड

कर्ज घेतलेल्या आणि वेळेत कर्ज फेडू न शकलेल्या कारखान्यांसाठी ‘ओटीएस’ योजना लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे अनास्कर यांनी सांगितले.राज्यातील कारखानदारी टिकण्यासाठी राज्य बँक सुरवातीपासून प्रयत्नशील असून यापुढच्या काळातदेखील सहकारी कारखानदारीच्या सक्षमतेसाठी बँक काम करेल, असे अनास्कर यांनी सांगितले.

vidyadhar anaskar
उपमुख्यमंत्र्यांना हरवणाऱ्या पल्लवी पटेल यांच्या नवऱ्यानेच आता सोडला पक्ष

राज्य बँकेकडून अडचणीतील जिल्हा बँकांच्या अंतर्गत विविध कार्यकारी सोसायट्यांना थेट कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी नाबार्डने मंजुरी दिली असून, शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. राज्य बॅंकेने पीककर्जाचे ९७ टक्के उद्दिष्ट्य पूर्ण केले असून, १७ हजार ७५७ कोटींचे कर्जवाटप केले आहे. काही राष्ट्रीयकृत बॅंकांनी केवळ ३७ टक्केच पीककर्ज पुरवठा केला आहे, असे अनास्कर यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (२०२१-२२)

ढोबळ नफा : १ हजार ४०२ कोटी

निव्वळ नफा : ६०२ कोटी

बँकेचा स्वनिधी : ६ हजार कोटी

उच्चांकी उलाढाल : ४७ हजार २८ कोटी

लेखापरीक्षण : ‘अ’ ऑडिट वर्ग

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in