श्रीनिवास पाटील म्हणाले; असा माणूस नास्तिक कसा असू शकतो ?

‘सकाळ माध्यम समूहा’च्यावतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात खासदार पाटील बोलत होते.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आळंदीत एकदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली होती. त्यावेळी मी स्वत: हजर होतो. त्यानंतर त्यांना वाटले अशीच पृष्पवृष्टी संत तुकाराम महाराजांच्या देहूतील पादुका मंदीरावर करायला हवी. तातडीने त्यांनी लगेच केलीसुद्धा, अनेक धार्मिक संस्थांना कोट्यवधी रूपयांचा निधी त्यांनी दिल्याचे मला चांगले ठाऊक आहे, असे सांगत असा माणूस नास्तिक कसा असू शकतो, असा प्रश्‍न खासदार श्रीनिवास पाटील यांनी केला.

Sharad Pawar
...आता रेल्वेप्रमाणे ट्रक आणि बस इलेक्ट्रिक केबलवर चालणार !

‘सकाळ माध्यम समूहा’च्यावतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात खासदार पाटील बोलत होते. कौटुंबिक स्वरूपात आयोजित केलेल्या या सोहळ्याला पवार यांच्याशी संबंधित काही मोजक्या लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पवार यांच्याविषयी विविध मान्यवरांनी आपल्या आठवणी सांगितल्या. खासदार आणि ज्येष्ठ नेते पवार यांचे महाविद्यालयीन मित्र असलेल्या श्रीनिवास पाटील यांनी पवार यांच्या अनेक आठवणी यावेळी सांगितल्या. पवार यांच्या नास्तिकेबद्दच चर्चा घडवून आणणारे विधान काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. त्या पाश्‍र्वभूमीवर खासदार पाटील यांनी पवार यांची आळंदी आणि देहूतील मंदीरांवर केलेल्या पृष्पवृष्टीची आठवण ताजी केली.

Sharad Pawar
खार पोलिस ठाण्यात सोमय्यांच्या विरोधात घोषणा देणारे महाडेश्वर पोलिसांच्या जाळ्यात...

पवार यांच्याविषयी आठवण सांगताना खासदार पाटील म्हणाले, ‘‘आळंदीच्या संत ज्ञानेश्‍वर महाराज समाधीवर पृष्पवृष्टी करण्याची कल्पना पवार यांनी मांडली. त्यानुसार पृष्पवृष्टी केली. त्यावेळी मी हजर होतो. त्यानंतर मी घरी परतलो. पवार यांना वाटले अशीच पुष्पवृष्टी देहूतील तुकाराम महाराज पातुका मंदीरावर करायला हवी. त्यानंतर तातडीने त्यांनी ते केलेसुद्धा.अनेक धार्मिक संस्थांना कोट्यवधी रूपयांचा निधी दिल्याचे मला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे अशा माणसाला आपण नास्तिक म्हणू शकतो का?’’

गायक आनंद भाटे यांचे गायन, शाहीर नंदेश उमप यांनी सादर केलेले महाराष्ट्र गीत तसेच पवार यांच्यावरील नव्याने तयार केलेले गीत यावेळी सादर केले. दृकश्राव्य माध्यमातून क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी पवार यांच्याविषयी सांगितलेल्या आठवणी, कबड्डीपटू माया आखरे, क्रिकेट स्तंभलेखक सुनंदन लेले यांनी सांगितलेल्या आठवणी. पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथनातील काही भागाचे श्रेया बुगडे व भूषण करंदीकर यांनी केलेले वाचन, मित्र,आप्तेष्ठांच्या आठवणीने रंगलेल्या या कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ नेते पवार यांचा सत्कार आणि मनोगताने झाली. पवार यांचे मित्र विठ्ठल मणियार, सरहद या संस्थेचे संस्थापक संजय नहार, हेमंत टकले यांनी पवार यांच्या अनेक आठवणी यावेळी सांगितल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com