कॉंग्रेसमधील जुने-जाणते श्रीकांत शिरोळेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहोत.
IMG-20210716-WA0053.jpg
IMG-20210716-WA0053.jpg

पुणे : पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष, कॉंग्रेसचे जुने नेते श्रीकांत शिरोळे (shrikant shirole) तसेच माजी नगरसेवक सदानंद शेट्टी (sadanand shetti) यांच्यासह वानवडी भागातील प्रफुल्ल जांभुळकर व केव्हिन मॅन्युअल यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले.(Srikant Shirole, a veteran of the Congress, joins the NCP) 

ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहोत. पुणे शहराचा विकास कणखर नेतृत्व आणि दूरदृष्टी असलेले अजित पवार करू शकतात, यावर आमचा ठाम विश्वास आहे. यापुढे पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही निष्ठेने पार पाडू, अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली. 

शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून, या पक्षप्रवेशाने निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. आज झालेले पक्षप्रवेश ही सुरवात आहे. यापुढील काळात अनेकजण राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे जगताप यांनी सांगितले. 

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपा तसेच अन्य पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या आजी-माजी नगरसेवकांची मोठी यादी असल्याचे सांगण्यात येते. अनेक विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत असून यात भाजपाच्या नगरसेवकांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे. 
Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com