गोयल यांना अधीक्षकपदाचा पदभार दिल्यावर डॅा. देशमुखांनी पुण्याबद्दल व्यक्त केली खास शब्दात कृतज्ञता...

Pune Police : विद्यार्थी असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी काही काळ मी पुण्यात होतो.
Ankit Goyal, Dr. Abhinav Deshmukh, Pune Police Latest News
Ankit Goyal, Dr. Abhinav Deshmukh, Pune Police Latest NewsSarkarnama

पुणे : नुकत्याच ४३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्याच्या ग्रामीण पोलीस अधिक्षकपदी अंकित गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.गोयल यांनी आज (ता. ३० ऑक्टोबर) आपल्या पदाचा पदभार पुणे ग्रामीणचे माजी पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख यांच्याकडून स्विकारला. Pune Police

दरम्यान, डॅा. देशमुख यांनी गोयल यांना पदभार दिल्यावर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पुण्यात आपल्याला काम करण्याची संधी मिळाली हे मोठं भाग्य मानतो,असे म्हणत त्यांनी पुणेकरांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. (Ankit Goyal, Dr. Abhinav Deshmukh, Pune Police Latest News)

Ankit Goyal, Dr. Abhinav Deshmukh, Pune Police Latest News
जुही चावलाच्या ट्वीटवर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले,अशा प्रकारच वक्तव्य करतांना...

डॅा. देशमुख आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, "शिवछत्रपतींची जन्मभूमी-शिवनेरी, स्वराज्याचे पहिले तोरण-तोरणा, शिवरायांची पहिली राजधानी-राजगड, मुरारबाजींचे शौर्य -पुरंदर, तानाजीचा पराक्रम -सिंहगड संभाजीराजांचे बलिदान- वढू तुळापूर, ज्ञानोबा ,तुकोबा यांच्या शब्दांनी आणि ज्योतिबा सावित्रीच्या कार्याने पवित्र झालेल्या या भूमीत कर्तव्य बजावण्याचे संधी लाभली हे मोठे भाग्य..आज नूतन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना कार्यभार सोपवला, त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा...माझे सर्व सहकारी, वरिष्ठ आणि पुणेकरांचे कोटी कोटी आभार..,"अशा शब्दात त्यांनी पुण्याचं महत्व आणि पुणेकरांचे आभार व्यक्त केले आहे.

"पुण्यासारख्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली याचे समाधान वाटते," अशी प्रतिक्रिया डॉ. देशमुख यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, विद्यार्थी असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी काही काळ मी पुण्यात होतो. त्यामुळे पुण्यात काम करण्याचा आनंद आणि समाधान खूप वेगळं असल्याची भावना डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.

Ankit Goyal, Dr. Abhinav Deshmukh, Pune Police Latest News
Robert Vadra : नरेंद्र मोदींची लोकांना भीती वाटतेय...

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणात आहेत तसेच पुणे शहराभोवतालचा परिसर विकसित होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संपूर्ण जिल्हा महत्त्वाचा आहे. दोन वर्षाच्या कालावधीत डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळला. आता त्यांची बदली झाली असून ती नेमकी कुठे झाले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in