हसन मुश्रिफांच्या प्रकरणात सोमय्या केंद्रीय ग्रामविकास सचिवांकडे तक्रार करणार

केंद्रीय ग्राम विकास विभागाच्या सचिवांकडेदेखील तक्रार करण्यासाठी उद्या दिल्लीला जाणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
 Hasan Mushrif, Kirit Somaiya
Hasan Mushrif, Kirit Somaiya Sarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : ग्राम विकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी ग्रामपंचायत योजनेत केलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची तक्रार केंद्रीय ग्रामविकास विभागाच्या सचिवांकडे करणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष किरीट सोमय्या यांनी आज पुण्यात सांगितले.(Somaiya will lodge a complaint with the Union Rural Development Secretary in the case of Hasan Mushrif)

राज्यातील ग्रामपंचायतींसाठी केंद्र सरकारच्या निधीतून असलेल्या पंधराशे कोटी रूपयांच्या योजनेत मुश्रिफ यांनी घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. हे प्रकरण ‘एसीबी’कडे सोपवून वळसे-पाटील यांनी पोलिटिकल सेटींग केले आहे.तरीही या प्रकरणी ‘एसीबी’ आधिकाऱ्यांकडे उपस्थित राहून तक्रार देत जबाब नोंदवल्याचे सोमय्या यांनी सांगितले.या प्रकरणाचा पाठपुरावा राज्याच्या पातळीवर करणार आहे. मात्र, केंद्रीय ग्राम विकास विभागाच्या सचिवांकडेदेखील तक्रार करण्यासाठी उद्या दिल्लीला जाणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

 Hasan Mushrif, Kirit Somaiya
सोमय्या म्हणाले;हसन मुश्रिफांच्या प्रकरणात वळसे-पाटलांनी केले ‘पोलिटिकल सेटींग’

ग्रामविका मंत्री मुश्रिफ यांच्यासंदर्भात एकुण तीन तक्रारी करण्यात आल्या आहेत. यातील दोन तक्रारी मुश्रिफ व त्यांचे जावई यांच्या विरोधात साखर कारखान्या संदर्भात आहे. या प्रकरणात शंभर कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तिसरी तक्रार ग्रामविकास विभागाकडून ग्रामपंचायतींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेतील भ्रष्टाचारासंदर्भात आहे. या तीन्ही तक्रारी संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.

 Hasan Mushrif, Kirit Somaiya
चित्रा वाघ म्हणाल्या;सावित्रीच्या लेकींसाठी महाराष्ट्र बंद कधी करणार

मनी लॉन्ड्रींग प्रकरणात राज्य मंत्रीमंडळातील दोन मंत्री व काही नेते अकलेले आहेत. त्याची माहिती गोळा करण्यात काम सरू असून लवकरच ती माहितीदेखील समोर येईल,असे सोमय्या यांनी सांगितले.आजच्या दौऱ्यात सोमय्या यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांचीही भेट घेतली. यानंतर कसबा, खडकवासला या मतदासंघातील कार्यकर्त्यांशी संवादाचा कार्यक्रम पक्षाच्यावतीने ठेवण्यात आला होता.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com