आमच्या शक्तीपीठावर हल्ला करणाऱ्या भाजपला मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

शरद पवारांना भेटल्यावर एक प्रकारची ऊर्जा मिळते
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama

बारामती : आमचे जे शक्तीपीठ आहे, त्या शक्तीपीठावर घाव घालून भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या विचारधारेच्या लोकांना असं वाटत असेल की आपल्याला काहीतरी यश मिळाले. पण, त्यांनी असे कितीही प्रयत्न केले तरी हे भारतीय जनता पक्षाला ह्या महाराष्ट्राच्या माती गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. (Social Justice Minister Dhananjay Munde criticizes BJP)

दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मंत्री धनंजय मुंडे हे शरद पवार यांना भेटण्यासाठी बारामतीत आले होते. मुंडे यांनी शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी जाऊन त्यांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील इशारा दिला. गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि इन्कम टॅक्स तसेच सीबीआयकडून छापेमारी करण्यात येत आहे. तसेच त्यांची काही संपत्ती जप्त करण्यात आल्याचीही चर्चा रंगली होती. त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे बोलत होते.

Dhananjay Munde
भाजपच्या आशिष शेलारांनी सांगितले राज ठाकरे यांच्या भेटीचे कारण...

धनंजय मुंडे म्हणाले की, प्रथा परंपरेप्रमाणे दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने राज्यभरातील असंख्य लोक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी येत असतात. आजही संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक विठ्ठलभक्त आपल्या विठ्ठलाचे म्हणजे शरद पवार यांचे दर्शन घेण्यासाठी बारामतीत आले आहेत. आम्हीही भक्त म्हणून पवार साहेब यांच्या दर्शनासाठी बारामतीत आलो आहोत. पाडव्याच्या निमित्ताने जसे आम्हाला शरद पवार यांनी आशीर्वाद दिले, तसे त्यांनी सर्वांनाचा आशीर्वाद दिले आहेत. मंत्रिमंडळातील एक मंत्री या नात्याने राज्यातील १२ कोटी जनतेलाही मी दिवाळी आणि पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो.

Dhananjay Munde
विधान परिषदेसाठी कॉंग्रेसकडून तीन नावांची शिफारस

आमचे दैवत असलेल्या शरद पवार यांना भेटण्यासाठी आम्ही दरवर्षी येत असतो, असं सांगत पवारांना भेटल्यावर एक प्रकारची ऊर्जा मिळते, असेदेखील मुंडे या वेळी म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या नसल्याचेदेखील मुंडे यांनी स्पष्ट केले. ज्या वेळी शुभेच्छा मिळतील, त्या वेळी आपल्याला कळवले जाईल, अशी मिश्किल टिप्पणी सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in