Loksabha Election 2023: ...तर पुणे आणि चंद्रपूरची पोटनिवडणूक होणार नाही

Loksabha Election News : लोकसभा किंवा विधानसभेची जागा रिक्त झाल्यावर या जागेसाठी सहा महिन्यांंच्या आत पोटनिवडणूक घ्यायची असते.
Loksabha Election 2023:
Loksabha Election 2023:Sarkarnama

Pune -Chandrapur Loksabha Election महिनाभरापूर्वी खासदार गिरीश बापट आणि त्यांच्यापाठोपाठ काल (३० मे) चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने लोकसभेच्या या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. भाजपसह काँग्रेसनेही या निवडणुकांची तयारी सुरु केली. पण वर्षभरावर आलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होऊ नयेत, अशी भाजपसह (BJP) काँग्रेसचीही अशीच इच्छा असल्याचे दिसत आहे. (...So, there will be no by-elections for Pune and Chandrapur)

Loksabha Election 2023:
Shambhuraj Desai On Raut : ठाकरे-शिंदे गटाच्या दोन नेत्यांमध्ये आरपारची लढाई; थेट नोटीस पाठवणार...

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, लोकसभा किंवा विधानसभेची जागा रिक्त झाल्यावर या जागेसाठी सहा महिन्यांंच्या आत पोटनिवडणूक घ्यायची असते. पण त्याला दोन गोष्टींचा अपवाद असतो. लोकसभा किंवा विधानसभेची मुदत संपण्यास एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असेल तर या पोटनिवडणुका घेता येत नाही. (Loksabha Election 2023)

तर दुसरा अपवाद म्हणजे केंद्र सरकारशी चर्चा करुन पुढील सहा महिन्यांत पोटनिवडणूक घेणे शक्य नाही, याची निवडणूक आयोगाला खात्री पटवून देणे. यातही, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, अशा काही कारणांमुळे पोटनिवडणूक पुढे ढकलता येऊ शकते.

Loksabha Election 2023:
Punjab Cabinet Expansion : मंत्रिमंडळात दोन नव्या चेहऱ्यांना संधी ; प्रकाश सिंह बादल यांचा पराभव करणारे आमदार झाले मंत्री

२९ मार्च २०२३ ला खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांचे निधन झाले. त्यामुळे २९ सप्टेंबर पर्यंत निवडणूक घेणे आवश्यक आहे. तर काल (३० मे) खासदार बाळू धानोरकर यांचेही निधन झाले. कायद्यानुसार पुढील सहा महिन्यात या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक होणे अपेक्षित आहे. पण पुढील वर्षी १६ जून २०२४ ला विद्यमान १७ व्या लोकसभेची मुदत संपत आहे. लोकसभेची मुदत संपण्यास एक वर्ष १८ दिवस शिल्लक आहेत. पण केंद्र सरकारशी चर्चा सहा महिन्यांच्या कालावधीत पोटनिवडणुका घेणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाचे मत झाल्यास या पोटनिवडणूका टळू शकतील, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in