Nana Patole News: ...म्हणून नाना पटोलेंच्या कार्यक्रमाला पुणे विद्यापीठ प्रशासनाची 'नो परमिशन'!

Savitribai Phule Pune University : ...तरीदेखील पटोलेंच्या कार्यक्रम घेण्यावर विद्यार्थी संघटना ठाम आहेत.
Nana Patole News
Nana Patole NewsSarkarnama

Pune News: काँग्रेसचे नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असतात. पण आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पटोलेंच्याच कार्यक्रमाला प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्याचं समोर येत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थी संघटनांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या'विद्यार्थी संवाद' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला विद्यापीठ प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. परवानगी नाकारण्यामागं जी २० परिषदेच्या अनुषंगाने कार्यक्रम असल्याचं कारण दिलं आहे. तरीदेखील पटोलेंचा कार्यक्रम घेण्यावर विद्यार्थी संघटना ठाम आहेत.

Nana Patole News
Anil Parab News : ठाकरे गटाचे नेते अनिल परबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, दापोली रिसॉर्ट प्रकरणी 'ही' अपडेट

नाना पटोले(Nana Patole) हे विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक अडचणी, वसतीगृह, भोजनगृहाचा दर्जा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी 10 मे ला सावित्रीबाई फुले विद्यापीठात येणार होते. याच पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठात विविध विद्यार्थी संघटनांकडून 'विद्यार्थी संवाद' हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, आता प्रशासनानं कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.

Nana Patole News
Ahmednagar name change: अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी होळकर करा; आता वंशजांनीच केली मागणी...

आधी 'या' प्रकरणी विद्यापीठाची बदनामी

शुभम जाधव(Shubham Jadhav) या रॅपरने सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत ज्या ठिकाणी विद्यापीठाची अधिसभा भरते तिथे अश्लील भाषेत रॅप साँगचं शूटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यात ज्या खुर्चीवर कुलगुरु बसतात त्या खुर्चीवर बसून समोर टेबलवर दारुची बाटली ठेवून शुभम जाधव या रॅपरने रॅप साँग म्हटलं आहे. या प्रकरणी शुभम विरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nana Patole News
NIA Action On Terror Funding: 'एनआयए'ची टेरर फंडिंगविरोधात कारवाई; काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत छापेमारी

अभाविपचा राडा...

अभाविपने काही दिवसांपूर्वी पुणे विद्यापीठामध्ये अश्लील रॅप साँग शूट झाल्याप्रकरणी आणि त्यावर कुलगुरूंनी काय कारवाई केली? असा सवाल विचारत राडा घातला होता. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सुरु असलेली बैठकही यावेळी अभाविपनं उधळून लावली. यामध्ये काही ठिकाणी काचा देखील फूटल्या आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com