Savarkar Gaurav Yatra : ...म्हणून आमदार नसलेल्या 'या' मतदारसंघातही भाजप काढणार सावरकर गौरव यात्रा!

BJP NEWS : पहिल्यांदा ही यात्रा उद्योगनगरीत २ तारखेला निघणार होती.मात्र, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे ती ९ तारखेपर्यंत स्थगित झाली.
Savarkar Gaurav Yatra
Savarkar Gaurav Yatra Sarkarnama

Pimpri Chinchwad News : सावरकरांचा वारंवार अपमान केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये काढण्यात येणाऱ्या सावरकर गौरव यात्रेत दुसऱ्यांदा बदल झाला आहे.आता ती पिंपरी आणि चिंचवडमध्ये परवा (ता.९) तर भोसरी या शहरातील तिसऱ्या विधानसभा मतदारसंघात १२ एप्रिलला काढण्यात येणार आहे.

राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांकडे या यात्रेची जबाबदारी भाजपने दिली आहे. आमदार नसलेल्या ठिकाणी स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्याकडे ती सोपविण्यात आली आहे.त्यानुसार उद्योगनगरीत चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आणि भोसरीत महेश लांडगे हे आमदार या यात्रेचे संयोजक आहेत.

तर,भाजपचा आमदार नसलेल्या पिंपरीत (तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अण्णा बनसोडे, आमदार आहेत) ही जबाबदारी पक्षाचे तरुण नेते आणि प्रदेश सचिव अमित गोरखेंकडे देण्यात आली आहे.मावळात माजी मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे, खेडला युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, आंबेगावात पिंपरी-चिंचवडकर विधान परिषद सदस्या उमा खापरे,तर शिरूरला खासदार प्रकाश जावडेकर हे या यात्रेचे संयोजक आहेत.

Savarkar Gaurav Yatra
Ajit Pawar on Corona : कोरोना वाढतोय पण सरकार गंभीर नाही; अजित पवारांची टीका

पहिल्यांदा ही यात्रा उद्योगनगरीत २ तारखेला निघणार होती.मात्र, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे ती ९ तारखेपर्यंत स्थगित झाली.आता त्यात पुन्हा थोडा बदल झाला आहे. पिंपरी आणि चिंचवडला ती ९, तर भोसरीत १२ तारखेला निघणार आहे.पिंपरीत ही यात्रा परवा सायंकाळी साडेचार वाजता आकुर्डीतील खंडोबा मंदिर ते विठ्ठलवाडीतील विठ्ठल मंदिर अशी काढली जाणार असल्याची माहिती सावरकर गौरव यात्रा पिंपरी विधानसभा प्रमुख श्री अमित गोरखे यांनी दिली.

काल तिच्या नियोजन तथा तयारीची बैठक आ.खापरे आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तीत यात्रेचा समारोप सावरकरांवरील व्याख्यानाने करायचे ठरले.

Savarkar Gaurav Yatra
Ashish Deshmukh Dismiss : अखेर आशिष देशमुख काँग्रेसमधून निलंबित; कारणे दाखवा नोटीस बजावली..

भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप मोरे,शहर सरचिटणीस राजू दुर्गे,शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, माजी नगरसेवक केशव घोळवे,मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, सुजाता पालांडे तसेच संजय मंगोडेकर, नंदू भोगले आदी या बैठकीला उपस्थित होते.

आ. जगतापांकडून चिंचवडच्या यात्रेचा आढावा...

चिंचवडला रहाटणीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते तापकीरनगरपर्यंत सावरकर गौरव यात्रा काढली जाणार आहे. त्याअनुषंगाने आ.अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच पक्ष संघटनेची पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालयात आढावा बैठक घेतली.

यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजपचे शहर सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे, प्रदेश निमंत्रित सदस्य व चिंचवड विधानसभा प्रभारी संतोष कलाटे, महिला मोर्चा शहराध्यक्ष उज्वला गावडे, सांगवी-काळेवाडी मंडलाध्यक्ष विनोद तापकीर आदी उपस्थित होते.बैठकीपूर्वी दिवंगत खा.बापट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com