Kasba By-Election : ...म्हणून मी बंडखोरी केली; दाभेकरांनी सांगितलं बंडखोरीचं कारण

Rebellion in Congress : कसब्यातून भाजप आणि काँग्रेसलाही बंडाळीचं ग्रहण
Balasaheb Dabhekar
Balasaheb DabhekarSarkarnama

Pune Congress : कसब्यात भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने टिळक कुटुंबियांमध्ये नाराजी आहे. तर महाविकास आघाडीतून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसचे जुने सभासद बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी केली. दरम्यान सोमवारी (ता. ६) रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर आज (ता. ७) काँग्रेसचे बंडखोर बाळासाहेब दाभेकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) यांनी गटबाजी आणि त्यांना कसे डावलेले गेले, याबाबत माहिती देत काँग्रेसबाबात नाराजी व्यक्त केली. दाभेकर म्हणाले, "मी काँग्रेसचा जुना कार्यकर्ता आहे. १९७६ पासून शहरात काँग्रेसचे काम करीत आहे. असे असतानाही मला डावललं गेलं. त्यामुळंच आज मी अर्ज भरला आहे. तसेच वारंवार माहिती देऊनही पक्षश्रेष्ठीही डावलत आहेत", असा आरोप दाभेकर यांनी केला आहे.

Balasaheb Dabhekar
Kasba By Election : '' वीस वीस वर्ष नगरसेवक राहिलात तरी..?''; भाजप,काँग्रेसच्या उमेदवारांना दवेंचा सवाल

पुढे बोलातना त्यांनी पक्षाकडून कसा अन्याय केला याबाबत माहिती दिली. दाभेकर म्हणाले, "गेले ४० वर्षे प्रामाणीकपणे करूनही पक्षाने काहीच दिलं नाही. पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी सुरू आहे. फक्त पटोलेच नाही, इतरही अनेक पदाधिकारी आहेत की ज्यांच्यामुळं मला बंडखोरी करण्याची वेळ आली."

Balasaheb Dabhekar
Congress News : जिल्हा काॅंग्रेसने मरगळ झटकली, आंदोलनात दिसली नेत्यांची ऐकी..

यानंतर त्यांनी ते पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याचेही सांगितले. दाभेकर म्हणाले, "यापूर्वीही या मतदार संघातून इच्छुक असल्याचे वरिष्ठांना सांगितलं होतं. आता कसब्यातील उमेदवारीबाबत मला शेवटपर्यंत अंधारात ठेवलं, पण उमेदवारी जाहीर केली नाही. अनेक वेळा पक्षश्रेष्ठींना सांगून सुद्धा काँग्रेसने माझ्यावर अन्याय केला म्हणूनच मी आज बंडखोरी केली."

Balasaheb Dabhekar
थोरातांच्या राजीनाम्यावर शिंदे म्हणतात ‘काळजी करण्याचे कारण नाही...’

दरम्यान काँग्रेसने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिली तर मी बंडखोरी करणार असा इशाराही बाळासाहेब दाभेकर यांनी पक्षाला दिला होता. त्यानंतर आजा त्यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. कसब्यातून भाजप आणि काँग्रेसमधूनही बंडाळी झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांपुढील आव्हाने वाढली आहेत.

उमेदवारीवरुन काँग्रेसपक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी महाआघाडीतील काँग्रेस पक्षातून इच्छुकांची यादी मोठी आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे निरीक्षक संग्राम थोपटे यांनी ऑनलाईन १६ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यात रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर यांच्या नावांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com