...तर 'हर हर महादेव' म्हणत हिंदूंनी तयार राहा : मनसेचा आंदोलनाचा इशारा!

Raj THackeray : पुण्यात इस्लामिक दहशतवादी आश्रयास असल्याचे मनसेने म्हंटले आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

पुणे : पुण्यात एटीएस आणि एनआयएने दोनच दिवसांपूर्वी कारवाई केली होती. यात कोंढव्यातून पॉप्युलर फ्रंट इंडियाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली. या विरोधात पुण्यात इस्लामिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यात सहभागी झालेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही आंदोलनकांनी यावेळी "पाकिस्तान जिंदाबादच्या" घोषणा दिल्या. यावर आता मनसे आक्रमक झाली आहे.

पुणे इस्लामिक दहशदवादी हालचालींचे ठिकाण होत आहे. मागील काही काळापासून पुण्यात इस्लामिक दहशदवाद्यांचे कारवाया होत आहेत. तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी आणि बांगलादेशी इस्लामिक घुसखोर राहतात, हे मनसेने सातत्याने पुढे आणले आहे.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलून द्यावे, यासाठी मनसे सातत्याने आंदोलने करीत आहे. तसेच पुणे आणि पिंपरी - चिंचवड शहरात अनेक ठिकाणी इस्लामिक मूलतत्ववाद्याचे दहशतवादी आश्रयास असतात. याबाबत पोलिसांना माहिती देवूनही कारवाई होत नाही, असे पुणे मनसेकडून सांगण्यात आले.

Raj Thackeray
PM मोदींच्या हत्येचा PFI ने रचला होता कट ; ईडीचा न्यायालयात दावा

एकूणच मूलतत्ववादी इस्लामिक दहशवाद्यांकडून पुणे शहराला केंद्र बनवण्यात आले आहे, असे चित्र काल परवाच्या अटकसत्रातून समोर येत आहे. त्यामुळे इथे जर इस्लामिक मूलतत्ववादी "पाकिस्तान जिंदाबाद " च्या घोषणा देत असतील तर हिदुजननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार देशाच्या रक्षणासाठी "हर हर महादेव "म्हणत महाराष्ट्र सैनिक आणि हिंदूंनी तयार राहिले पाहिजे. उद्या रविवार (२५ सप्टेंबर) दुपारी १ वाजता टिळक चौक (अलका टॉकीज चौक ) येथे मनसे आंदोलन करणार, असे पुणे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in